“कंपनीची सर्व कामं थांबवत ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य”

देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने रुग्णालयांमधील ऑक्सिजनची तुटवड्याचा प्रश्न सोडमवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. यानुसार कंपनीने थेट वैद्यकीय वापरासाठीच्या लिक्विड ऑक्सिजनचा मोफत पुरवठा करण्यासाठी थायलंडमधून अद्ययावत ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर मागवले आहेत. यामुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा 3 राज्यांमधील रुग्णालयांना वेगाने ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य होणार आहे. देशातील ऑक्सिजनचा तुटवडा पाहता एमईआयएलने आपले इतर सर्व कामं थांबवत प्राधान्याने ऑक्सिजन प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रीत केलंय. त्यामुळे कंपनीचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

एमईआयएलच्या (MEIL) या महत्त्वकांक्षी योजनेतील 11 ऑक्सिजन टँकरपैकी पहिल्या टप्प्यात 3 टँक हवाई दलाच्या बेगमपेट स्थानकावर पोहचले आहेत. उर्वरित 8 ऑक्सिजन टँकर पुढील काही दिवसात आणखी दोन टप्प्यात पोहचणार आहेत. आयात करण्यात येणाऱ्या प्रत्येक टँकरमध्ये जवळपास 1 कोटी 40 लाख लिटर वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करता येणार आहे. म्हणजेच एकूण 11 टँकर्समध्ये तब्बल 15 कोटी 40 लाख ऑक्सिजन रुग्णालयांना वेगाने पोहचवता येणार आहे.

एमआयईएलचे (MEIL) वरिष्ठ अधिकारी, तेलंगणाचे अर्थमंत्री टी. हरीश राव, तेलंगणाचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सल्लागार समिती या सर्व मोहिमेवर लक्ष ठेऊन आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या या टँकरची आयात थायलंडमधील बँकॉकमधून करण्यासाठी देशाच्या संरक्षण मंत्रालयाने आणि परराष्ट्र मंत्रालयाने देखील परवानगी दिलीय. त्यामुळे संरक्षण दलाच्या विशेष विमानाने हे टँकर्स बँकॉकहून हैदराबादला आणले जात आहेत.

एमईआयएलचे उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी म्हणाले, “वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीपासून रुग्णालयांपर्यंत ऑक्सिजनची वाहतूक म्हणजे अनेक अडथळ्यांचं कोडं आहे. मात्र, आता या 11 क्रायोजेनिक टँकर्समुळे राज्य सरकारला तीव्र गरज असलेल्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात मदत होईल.”

विशेष म्हणजे एमईआयएलने कंपनीचे इतर सर्व कामं थांबवून ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य दिलंय. यासाठी त्यांच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. एमईआयएलच्या बोलरूम येथील युनिटमधून 9 मे ते 21 मे 2021 या काळात 29,694 मेट्रिक टन (3 कोटी लिटर) वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशाला करण्यात आलाय. म्हणजे दररोज सरासरी 400 ऑक्सिजन सिलेंडर येथून पुरवले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.