देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत आता काहीशी घट होताना दिसत आहे (Corona Cases in India). सलग तीन दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर कालच्या आकडेवारीत काहीशी घट पाहायला मिळाली. त्यानंतर आजही कोरोना रुग्णांच्या संख्या कालच्या तुलनेट घटली आहे. कालच्या दिवसात तब्बल 2 लाख 57 हजार 299 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येतही घट झाली आहे. कालच्या दिवसात 4 हजार 194 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 57 हजार 299 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 194 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 57 हजार 630 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 62 लाख 89 हजार 290 वर गेला आहे. देशात 2 कोटी 30 लाख 70 हजार 365 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 95 हजार 525 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 29 लाख 23 हजार 400 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 33 लाख 72 हजार 819 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.