आठवड्याच्या अपयशी झुंजीनंतर वराची प्राणज्योत मालवली

मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील पचोर शहरातील अजय शर्मा नामक 25 वर्षीय युवकाचा 25 एप्रिल रोजी सिहोर येथे विवाह संपन्न झाला. कोरोना नियमांचे पालन करीत एका मंदिरात मर्यादित लोकांमध्ये हा विवाह पार पडला. विवाहाच्या चार-पाच दिवसानंतर अजयला त्रास जाणवू लागला आणि शेवटी 29 एप्रिल रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील सदस्यांपैकी एक महिलाही कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

कोरोना युगात लग्न करून एका कुटुंबाचा आनंद उध्वस्त झाला. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एका 25 वर्षीय व्यक्तीचा लग्नात कोरोना संसर्ग झाला. भोपाळमधील कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह आल्यानंतर अजयवर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावत चालल्याने त्याला भोपाळला हलविण्यात आले. भोपाळच्या रुग्णालयात एक आठवडा अजय व्हेंटिलेटरवर होता. मात्र उपचारांचा काहीच फायदा झाला नाही. अखेर एक आठवड्याच्या अपयशी झुंजीनंतर अजयची प्राणज्योत मालवली.

अजयचा विवाह राजगढ जिल्ह्यातील नरसिंहगढ ब्लॉकमधील मोतीपुरा गावातील अन्नू शर्मा नावाच्या तरुणीशी झाला. अन्नूचे कुटुंब सिहोरमध्ये वास्तव्यास असल्याने विवाह तेथेच पार पडला. या विवाहात कुटुंबातील काही निवडक सदस्यच उपस्थित होते. अजयची वहिनीही कोरोना पॉझिटिव्ह असून कुटुंबातील बाकी सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना प्रोटोकॉलनुसार तरुणावर भोपाळमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या राजगढमध्ये विवाह आणि सामूहिक कार्यक्रमांवर बंदी आहे. मात्र काही लोक सरकारच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवत चोरुन विवाह करत आहेत. कोरोना काळात थोडासा बेजबाबदारपणा आपल्या आणि कुटुंबाच्या जीवावर बेतू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.