स्पुतनिक वी लसीचं वितरण रेड्डीज लॅबोरेटरीज करणार

केंद्र सरकारनं भारतातील लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून रशियाच्या स्पुतनिक वी या लसीला परवानगी दिली आहे. स्पुतनिक लसीच्या लसीकरणाला भारतात सुरुवात देखील झाली आहे. भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुतनिक वी लसीचं वितरण करणार आहे. भारतात स्पुतनिक वी लसीकरण राबवणयासाठी आता डॉ. रेड्डीज आणि अपोलो हॉस्पिटल यांच्यातएक करार झाला आहे. या करारानुसार पहिल्या टप्प्यात हैदराबाद त्यानंतर विशाखापट्टणममधील अपोलो हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध होईल. पुढे याचा विस्तार दिल्ली, मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुणे या शहरांमध्ये केला जाईल.

अपोलो हॉस्पिटलच्या संगीता रेड्डी यांनी स्पुतनिक वी चे दहा लाख डोस एका महिन्याला आम्हाला मिळतील असं सांगतिलं. स्पुतनिक लसीच्या वितरणासाठी आमच्याशी डॉ.रेड्डीजनं करार केला ही आनंदाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या.

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारनं कोविन अॕप बनवलं आहे. स्पुतनिक लसीच्या नोंदणीसाठी देखील Co-WIN वर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. अपोलो हॉस्पिटलचे हरि प्रसाद यांनी याविषयी माहिती दिली. डॉ. रेड्डीज आणि अपोलोच्या व्यवस्था आणि कोल्ड चेन स्टोरेज व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लसीकरण कार्यक्रमाची मदत होईल. स्पुतनिक वी लसीकरण अधिक प्रभावीपणे करण्यास कटिबद्ध आहोत, असं अपोलो हॉस्पिटलद्वारे सांगण्यात आलं आहे.

शिल्पा मेडिकेअर Sputnik V बनवणार

औषध निर्माता कंपनी शिल्पा मेडिकेअरनं Sputnik V लस बनवण्यासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज सोबत करार केला आहे. शिल्पा बायोलॉजिकल प्राइवेट लिमिटेड (एसबीपीएल) ने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज सोबत तीन वर्षांच्या कालावधीसाठी करार केला आहे. शिल्पा मेडिकअर कर्नाटकातील धारवाडमध्ये स्पुतनिक वी लसीचे डोस बनवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.