बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. तिने काही काळापूर्वी व्यावसायिक वैभव रेखीशी लग्न केले आहे. दिया मिर्झा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि आपल्या चाहत्यांना बर्याच विषयांवर माहिती देत असते. दियाने नुकतेच ट्विट केले आहे की, सध्या कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी वापरली जाणाऱ्या लसीची अद्याप गर्भवती महिलांसाठी क्लिनिकल चाचणी घेतली गेली नाहीय.
एका वापरकर्त्याने गर्भवती महिलांसाठी कोव्हिड प्रोटोकॉलविषयी माहिती दिली. त्याने ट्विट केले की, कोरोनामुळे होणारे नवीन संक्रमण टाळण्यासाठी गर्भवती महिलांनीही लसीकरण करून घ्यावे. युजरच्या या ट्विटवर दिया मिर्झाने उत्तर देऊन योग्य ती माहिती दिली.
दियाने ट्विट केले की, ‘हे खूप महत्वाचे आहे. वाचा आणि लक्षात ठेवा की, सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही लसींची तपासणी गर्भवती महिला किंवा स्तनपान करणार्या मातांसाठी केली गेली नाही. डॉक्टर म्हणतात की, या लसीची क्लिनिकल चाचणी होईपर्यंत गर्भवती महिला ही लस घेऊ शकत नाही
दियाने सोशल मीडियावर बेबी बंपसह एक फोटो शेअर करुन आपल्या प्रेग्नन्सीबद्दल माहिती दिली होती. त्या काळात ती हनिमूनसाठी मालदीवमध्ये गेली होती. जिथून तिने सुंदर फोटो शेअर केले आणि तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. वैभवशी लग्न करण्यापूर्वीच दिया गर्भवती राहिल्याने बर्याच लोकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर तिने ट्रोलर्सना योग्य उत्तर देताना सांगितले की, मी गर्भधारणेमुळे वैभवशी लग्न केले नाही. या सुंदर प्रवासात मला कोणतीही लाज वाटत नाही.
दिया मिर्झाने अलीकडेच तिच्या ‘रेहाना है तेरे दिल’ या चित्रपटातही सेक्सिझम असल्याचे सांगितले होते. दियाने सांगितले की, सेटवरील मेकअप आर्टिस्ट एक बाई नसून एक पुरुष होता, तर केवळ केशभूषा करण्यासाठी स्त्री होती. जेव्हापासून मी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली, त्यावेळी चित्रपटाच्या 120 पेक्षा जास्त क्रूमध्ये केवळ 4 ते 5 महिला होत्या. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, आपण पुरुषप्रधान समाजात राहतो. फिल्म इंडस्ट्री म्हणजे माणसाचा स्केल. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार इंडस्ट्रीमध्ये लैंगिक भेदभाव आहे. तिला कधीकधी वाटते की, ‘असे बरेच पुरुष आहेत जे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आहेत, ज्यांना त्यांच्या लैंगिक विचारसरणीबद्दल माहिती देखील नसते.’