‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसलाय. त्यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत 6 हजार 540 नागरिकांनी सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.

मुंबईत सर्व यंत्रणा सज्ज आहे, मुंबईत चक्रीवादळाचे परिणाम दिसत आहेत, अनेक भागात झाडं पडली आहेत, जीवितहानी नाही, मुंबईकरांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, वरळी सीलिंक सुरक्षतेसाठी बंद ठेवला आहे असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितली.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत

रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

रायगडला ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका, रायगडमध्ये नुकसानीचा आकडा वाढत आहे. आत्तापर्यंत एकाचा मृत्यू तर दोघे जखमी, नीता रमेश नाईक वय 58 राहणार आवेडा येथील महिलेचा मृत्यू. एका पशूधनाचाही मृत्यू, 2263 कुटुबांतील 8383 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मागील 24 तासात 23.42 mm पावसामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान.

गोव्यात चक्रीवादळ थंडावले

गोव्यात चक्रीवादळ थंडावले, पहाटेपासून पाऊस नाही, थोडा वारा, गोव्यात वादळानंतरची शांतता. तिकडे चक्रीवादळ गुजरातला १० ते ११ च्या दरम्यान पोहचेल, गुजरातकडे जाणारा वेग १६५ किमी प्रती तासाच्या जवळपास असणार, मुंबईतील एअरपोर्ट खबरदारीचा उपाय म्हणून ११ ते ३ वाजेपर्यंत बंद

मुंबईत ८० ते ९० किमी प्रति तास वादळाचा वेग, गुजरातला १० ते ११ च्या दरम्यान पोहचेल, गुजरातकडे जाणारा वेग १६५ किमी प्रती तासाच्या जवळपास असणार, मुंबईतील एअरपोर्ट खबरदारीचा उपाय म्हणून ११ ते ३ वाजेपर्यंत बंद, गुजरातमधील एअरपोर्ट देखील खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवले आहेत, महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळाची तीव्रता असेल, इतर भागात वादळी वाऱ्यासह हलक्या सरी, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं IMD चे कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं.

मुंबईमध्ये चक्रीवादळाचा धोका टळला

मुंबईच्यामध्ये चक्रीवादळाचा धोका टळलेला आहे. मात्र, येथे वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील वर्ली सी फेस परिसरातील समुद्र किनाऱ्यावर वाऱ्यासह रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडतोय. सोमवार मुंबईमध्ये 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.