केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी
सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली
देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट निर्माण झालेलं आहे. दिवसेंदिवस मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) देखील २७ जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकली आहे. ही परीक्षा आता १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
करोना संकटाला उत्तर देण्यास
आपल्याला उशीर : बलराम भार्गव
करोना संकट असतानाही निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतल्याने लोकांनी रोष व्यक्त केला होता. याशिवाय लाखोंच्या संख्येने हजेरी लावलेले धार्मिक कार्यक्रमही केंद्राकडून रोखण्यात आले नाहीत. यादरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव यांनी करोना संकटाला उत्तर देण्यास आपल्याला उशीर झाल्याचं मान्य केलं आहे.
महाराष्ट्रातील लॉकडाऊनची
मुदत 1 जूनपर्यंत वाढवली
महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. आता ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असेल. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकोरमायकोसिस वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते.
महाराष्ट्रात प्रवेश करतांना
आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक
ठाकरे सरकारने परराज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकार केला आहे. त्याशिवाय बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही. हा रिपोर्ट ४८ तास आधी काढलेला असावा असं आदेशात नमूद आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील.
अनाथ मुलांना पाच हजाराची
पेन्शन मध्य प्रदेश सरकारचा निर्णय
करोनामुळे अनेक पालकांचा जीव जात असल्याने लहान मुलांचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेतल मध्य प्रदेश सरकारनं पुढाकार घेतला आहे. करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मदतीचा हात पुढे केला केला आहे. अनाथ मुलांना प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. त्याचबरोबर या मुलांची मोफत शिक्षणाची जबाबदारीही सरकार उचलणार आहे.
दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान
घालण्यात पोलीस दलाला यश
धानोरा तालुक्यात आज सकाळी सी ६० पोलीस जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाला यश आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यात ६० सी जवानांनी सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र केले आहे. यात दोन मृतदेह जवानांना आढळून आल्याची केल्याची माहीती आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये महिलांचा समावेश आहे का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पंजाब नॅशनल बँकेने
व्याज दर बदलले
सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) त्यांच्याकडील मुदत ठेव खात्यांवरील व्याजदरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्याकडील मुदत ठेव खात्यांवरील व्याज दर बदलले आहेत. पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या ग्राहकांना 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर बँक 3.75 टक्के ते 5.25 टक्केपर्यंत व्याज देते. हे व्याज दर 1 मे 2021 पासून लागू झालेले आहेत.
लस आणि ऑक्सिजन सोबत
पंतप्रधान मोदी सुद्धा देशातून गायब
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी करोनावरील लसींचा तुटवडा आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींना टीकेचे लक्ष्य केलं आहे.
लस आणि ऑक्सिजन सोबत पंतप्रधान मोदी सुद्धा देशातून गायब आहेत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान सुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो”, असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बजाज ऑटोनं कर्मचाऱ्यांसाठी
केली मोठी घोषणा
करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बजाज ऑटोनं मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या आर्थिक मदतीच्या आणि इतर सुविधांबाबतच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी कंपनीकडून राखीव करोना बेडसारख्या निर्णयासोबतच करोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचा देखील समावेश आहे. आत्तापर्यंत बजाजनं वेगवेगळ्या सरकारी किंवा स्थानिक प्रशासनाच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रकल्पांना आर्थिक मदत देखील देऊ केली आहे.
सोशल मीडियासाठी सहा कोटी खर्च
करण्याचा निर्णय अजित पवारांनी केला रद्द
सोशल मीडिया हाताळण्यासाठी सहा कोटी खर्च करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रद्द केला आहे. अजित पवारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळण्याची जबाबदारी बाहेरील एजन्सीवर सोपवण्यात येणार होती. ठाकरे सरकार जवळपास सहा कोटी रुपये खर्च करणार होतं. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला होता. अजित पवार यांनी सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाहेरील एजन्सी नियुक्त करण्याची गरज नाही सांगत निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
काँग्रेस पक्षाचे माजी आमदार डॉ. रिनवा यांचा
शिरोमणी अकाली दलामध्ये प्रवेश
काँग्रेस पक्षाचे माजी आमदार डॉ. मोहिंदर रिनवा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिरोमणी अकाली दलामध्ये प्रवेश केला आहे. शिरोमणी अकाली दलचे प्रमुख सुखबिर सिंग बादल यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी त्यांनी पक्षप्रवेश केला. विशेष म्हणजे काँग्रेस पक्ष सध्या पंजाबमध्ये सत्तेत असून देखील सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने विरोधी पक्षात प्रवेश केल्यामुळे यावरून पंजाबच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मोहिंदर रिनवा यांनी पक्ष सोडण्याचं दिलेलं कारण हे काँग्रेसच्या जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे.
प्रकाश पादुकोण यांना
रुग्णालयातून डिस्चार्ज
भारताचे माजी बॅडमिंटनपटू आणि माजी ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियन प्रकाश पादुकोण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाची लागण झाल्यानंतर प्रकाश पादुकोण यांना १ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता, परंतु सर्वजण घरीच क्वारंटाइन होते.
SD social media
9850 60 3590