अभिनेता रणबीर कपूर याच्या चाहत्यांची यादी तशी खूप लांब आहे. या अभिनेत्याने आतापर्यंतच्या आपल्या कारकीर्दीत अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आपल्या कुटुंबाप्रमाणेच रणबीरने देखील मनोरंजन विश्वाचा मार्ग धरला. रणबीरने 2007 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘सांवरिया’ (Saawariya) चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण हा त्याचा पहिला चित्रपट नव्हता. या चित्रपटाच्या आधी देखील रणबीरने एका चित्रपटात काम केले होते.
सध्या रणबीर कपूर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नसला, तरी तो केवळ चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. अशा परिस्थितीत ‘सांवरिया’ हा रणबीरचा पहिला चित्रपट नव्हता, हे ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसेल.
जर ‘सांवरिया’ हा रणबीरचा पहिला चित्रपट नव्हता, तर मग त्याने नेमक्या कोणत्या चित्रपटात आधी काम केले होते ? रणबीरने बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या अगोदर ऑस्कर नामांकित चित्रपटात काम केले होते. ‘सांवरिया’ पूर्वी रणबीर कपूरने ‘कर्मा’ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले होते. 2004 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माता बी.आर.चोप्रा यांचे नातू अभय चोप्रा यांनी दिग्दर्शन केले होते.
हा तेव्हाचा काळ होता, जेव्हा रणबीर कपूर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होता. चित्रपटाला स्टुडंट ऑस्करसाठीही नामांकन देण्यात आले होते. रणबीरची ही शॉर्ट फिल्म केवळ 2 मिनिटांची होती, यात रणबीर कपूर व्यतिरिक्त शरद सक्सेना, मिलिंद जोशी, सुशोवन बॅनर्जी सारख्या कलाकारांनी अभिनय केला होता.