भाजपचा किंगमेकर हरपला! खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. प्रकृती अधिक खालावल्याने गिरीश बापट यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता वैकुठं स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
काही वर्षांपासून गिरीश बापट हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. यामुळे गेल्या काही महिन्यात ते सक्रीय राजकरणापासून दूर होते. कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारावेळी प्रकृती ठीक नसतानाही ते मैदानात उतरले होते. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावत चालली होती. गिरीश बापट यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. मात्र बुधवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारतातील एकमेव राज्य, येथील रहिवाशांना भरावा लागत नाही Income Tax
प्रत्येक भारतीय हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कर भरत असतो. मग तो पगारामुळे असोत, खाण्यासाठी, रोड टॅक्स, घरातील किंवा रोजच्या वापरातील वस्तु विकत घेणे, यासाठी टॅक्स हा माणसाला भरावाच लागतो. खरंतर या टॅक्समुळेच अर्ध्याअधीक वस्तु महागल्या आहेत. नाहीतर त्याची खरी किंमत ही फारच कमी असते. या टॅक्समुळे माणसाला नकोस झालं आहे.सिक्कीम हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे मूळ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. पण असं का? असा प्रश्न नक्की मनात उद्भवला असणार.
ईशान्येकडील सर्व राज्यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७१-एफ अंतर्गत विशेष राज्याचा दर्जा आहे. अशा परिस्थितीत देशाच्या इतर भागातील लोकांना या राज्यांमध्ये मालमत्ता किंवा जमीन खरेदी करण्यास बंदी आहे. त्याच वेळी, सिक्कीमच्या मूळ रहिवाशांना आयकर कायदा, 1961 च्या कलम 10 (26AAA) अंतर्गत प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे. म्हणजेच या राज्यातील जनतेला त्यांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही.
आयकर कायदा, 1961 च्या कलम 10 (26AAA) अंतर्गत, ही सूट फक्त सिक्कीमचे मुळचे रहिवासी असलेल्या लोकांसाठी उपलब्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निर्णयानंतर, सिक्कीममधील सुमारे 95% लोक या सूटमध्ये येतात.
कोट्यवधी रुपयांची विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांवर भीक मागण्याची वेळ
कोट्यावधी रुपयांच्या निधीची उलाढाल करून विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या ठेकेदारांची कोट्यवधींची थकीत बिलं आहे. कोरोनापासून फक्त आश्वासन मिळत असल्याने ठेकेदारांचाही संयम सुटत चालला होता. अखेर ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागात भिक मांगो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलन आता चर्चेचा विषय ठरत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम ठेकेदाराचे तब्बल चार कोटी रुपयाची बिले प्रलंबित आहेत. त्यांना बांधकाम विभागातर्फे अनेकवेळा आश्वासन दिले जात होते. येत्या मार्च महिन्याच्या आधी आपले प्रलंबित निधी मिळून जातील. मात्र, यावर्षी देखील सर्व ठेकेदारांचे तब्बल आठ ते दहा टक्केच बिलं मिळाली असून आमची चेष्टाच बांधकाम विभाग करीत आहेत. यामुळे आम्ही सर्व बांधकाम ठेकेदार मोठ्या आर्थिक संकटात सापडलो आहे. शासनाच्या दिरंगाईमुळे कोट्यवधी रुपयांचा निधी घेऊन विकास कामे करणाऱ्या आम्हा ठेकेदारांवर आज भीक मागण्याची वेळ आली असल्याचे आंदोलनकर्ते म्हणाले.
‘ठाकरे गटातील 2 खासदार संपर्कात’; केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांचा Rising India मध्ये गौप्यस्फोट
महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. काही जणांनी ठाकरेंची साथ सोडत, शिंदेंना साथ दिली. ठाकरेंचे आमदार शिंदे गटात गेले आहेत. दरम्यान आता ठाकरेंचे दोन खासदारही त्यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी रायझिंग इंडिया या नेटवर्क 18 च्या कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केला आहे.
केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटातील दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे.
आई-वडिलांचं टेन्शन झालं दूर, आता मुलं खाणार पौष्टिक पेन्सिल!
लहान मुलांना पौष्टिक खाणं कसं द्यायचं हा आई-वडिलांपुढे मोठा प्रश्न असतो. कारण, अनेक मुलं हे खाणं खाण्यास टाळाटाळ करतात. पण, आता त्यांचं हे टेन्शन दूर होणार आहे. कारण, दोन विद्यार्थिनींनी चक्क खाद्यपदार्थांपासून स्लेट पेन्सिल (पाटीवर लिहिण्याची पेन्सिल )तयार केलीय. या संशोधनाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होतंय. इंडियन सायन्स काँग्रेसमध्येही त्यांच्या या संशोधनाला मान्यता मिळाली आहे.हरिप्रिया आणि अफसियान सुलताना अशी या विद्यार्थिनींची नावं आहेत. त्या तेलंगणातील पेड्डापल्ली जिल्ह्यातील गोदावरीखानी येथील सरकारी हायस्कूलमध्येत् नववीत शिकत आहेत. बहुतेक मुलं वाचताना आणि लिहिताना स्लेट पेन्सिल तोंडात टाकतात आणि खातात आणि ती आजारी पडतात, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मुलांसाठी पौष्टिक पदार्थ असलेली पेन्सिल करण्याचा निर्णय घेतला.या दोन्ही मुलींनी आपली कल्पना शिक्षिका सुनीता यांना सांगितली. सुनिता यांनी त्या कल्पनेचं कौतुक करत त्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर त्यांनी सुका मेवा, तांदळाचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, साखर, गूळ आणि तीळ पूड यांसारख्या खाद्यपदार्थांपासून स्लेट पेन्सिल तयार केली.
आता घरबसल्या मतदान करता येणार; कोणाला मिळणार सवलत?
कर्नाटक राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. बुधवारी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की राज्यातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 13 मे रोजी मतमोजणीत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले की विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 13 एप्रिल रोजी जारी केली जाईल, नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल आहे, त्यानंतर 24 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे कर्नाटकात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.यावेळी कर्नाटक निवडणुकीत निवडणूक आयोग वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी एक नवीन आणि विशेष सुविधा देणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत घरबसल्या मतदानाची सुविधा 80 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध असेल.
रिक्षा चालवून गावातील मुलांसाठी उभारल्या 9 शाळा, अहमद अलींचं अनोख कामं
करीमजंग जिल्ह्यातील अहमद अली (87) सध्या अनेकांनासाठी प्रेरणा ठरत आहे. केवळ चर्चा करून समाज बदलत नसतो, यासाठी तुमच्या हातून कृत्य होण्याची गरज असते. यासाठी मेहनत आणि दृढनिश्चयाची गरज असते. आर्थिक आव्हानं असताना त्यांनी जिद्द सोडली नाही आणि वंचित मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांनी आपल्या गावात एका शाळेची सुरुवात करून एक सकारात्मक पायंडा पाडला.
रिक्षा चालवून आलेल्या पैशातून त्यांनी गावात 9 शाळा सुरू केल्या आणि आपल्या समाजातील मुलांना शिक्षेची कवाडं खुली करून दिली. या शाळेत त्यांना स्वस्त शिक्षण मिळतं. त्यामुळे गावातील मुलांना शिक्षण घेता येत आहे. अहमद अली बांगलादेश सीमेजवळील राज्य आसाममधील पाथरकंडीजवळी खिलोरबंद गावात राहतात. अली यांनी 1978 मध्ये आपलं गाव मधुरबंदमध्ये पहिली शाळा सुरू केली. यासाठी त्यांनी आपली काही जमीन विकली आणि जमिनीचा काही भाग शाळेला दान केला. ज्यावर आता शाळा उभारण्यात आली आहे. त्यांनी आपल्या 36 बीघा जमिनीपैकी 32 बीघा जमीन शाळा उभारणीसाठी दान केली. शाळेचं काम हे अहमदचे साठवलेले पैसे, आणि दररोजच्या कमाईतून होते.
खेळण्या बागडण्याच्या वयात चक्क एव्हरेस्टचा बेस कँप गाठला, सहा वर्षाच्या चिमुकलीचा वर्ल्ड रेकॉर्ड
स्वप्नांना, जिद्दीला आणि निर्धाराला खरंच वय नसतं. हे फक्त सहा वर्षांच्या चिमुकलीला बघून कळतं. साईशा राऊत या नवी मुंबईतल्या या सहा वर्षांच्या चिमुकलीने माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मिशन पूर्ण करण्याची किमया केलीय. ज्या वयात लहान मूलं वेगवेगळे खेळ खेळत असतात त्याच वयात साईशाने एवरेस्ट चढण्याचा निर्धार केला. आणि तो पूर्णही केला.
साईशा राऊत या सहा वर्षाच्या मुलीचे चक्क वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. त्यासाठी साईशाने प्रचंड मेहनत घेतली. रोज 14 किलोमीटर सायकलिंग 12 किलोमीटर वॉकिंग. शिवाय 1 तास स्विमिंग आणि योगा. अशी दिनचर्या ती फॉलो करायची. ही सगळी तयारी ते तिने केलेला हा रेकॉर्ड यात निरंतर तिच्या सोबत होते वडिल मंगेश राऊत.
साईशाने सर केलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर एवढी आहे. तर एव्हरेस्टचा बेस कॅम्प आहे 5300 मीटरवर. मायनस 10 ते 20 टेम्परेचरमध्ये नेपाळच्या लुक्लातून 22 किलोमीटरचा ट्रेक करुन बेस कँपपर्यंत पोहोचण्याची कामगिरी साईशानं फत्ते केली. “वाट बघ, आज इथवर आलेय, पुढे तुला पूर्ण सर करेल” असं एव्हरेस्टला ठणकाऊन सांगणाऱ्या साईशाने आता एवढ्यावर न थांबता रशियातलं सर्वांत उंच शिखर माउंट एलब्रस सर करण्याचा निर्धार केलाय. आणि तिचा निर्धार किती पक्काय याची साक्ष खुद्द माउंट एव्हरेस्ट देतोय.
विराट कोहली आणि शाहरुख खानच्या फॅन्समध्ये ‘ट्विटर वॉर’
भारताचा स्टार क्रिकेटर आणि सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान हे जगभरात नावाजलेल्या भारतीयांपैकी एक आहेत. आपल्या कामामुळे या दोघांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली असून जगाच्या कानाकोपऱ्यात यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु सध्या विराट कोहली आणि शाहरुख खान या दोघांच्या चाहत्यांमध्ये ट्विटर वॉर रंगला आहे. दोघांचे चाहते आपल्या आवडत्या स्टारला बेस्ट म्हणण्यावर भर देताना दिसत आहेत.
सुरुवातीला शाहरुखचे चाहते त्याच्या अभिनयाबद्दल आणि प्रसिद्धी वरून विराटच्या चाहत्यांना ट्रोल करत होते. तर त्यावर विराटाचे चाहते त्याच्या क्रिकेट फॉर्मबद्दल आणि इंस्टाग्रामवरील फॉलोवर्सवरून शाहरुखच्या चाहत्यांची फिरकी घेत होते. इथपर्यंत ठीक होत मात्र आता या दोघांच्या चाहत्यांमध्ये भांडण टोकाला जाऊन दोघांचे चाहते अपमानास्पद टिप्पणी आणि आक्षेपार्ह मिम्स शेअर करत आहेत. यामुळे ट्विटरवरील वातावरण तापलं आहे.
द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करून १ कोटीची लूट करणारी टोळी २४ तासांत गजाआड
द्राक्ष व्यापार्याला मारहाण करून एक कोटीहून अधिक रक्कम लुटणार्या टोळीला गुन्हा घडल्यानंतर २४ तासांत सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले. लुटीतील रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती अधीक्षक बसवराज तेली यांनी बुधवारी सायंकाळी दिली.याबाबत माहिती अशी की, द्राक्ष व्यापारी महेश शितलदास केवलाणी (वय ४९ रा. पिंपळगाव, ता. निफाड जि. नाशिक) हे शेतकऱ्यांना द्राक्ष खरेदीचे पैसे देण्यासाठी जात असताना तासगावमधील दत्तमाळ येथे असलेल्या गणेश कॉलनीमध्ये मोटार अडवून लुटण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला होता. या प्रकरणी नितीन खंडू यलमार (वय २२), विकास मारुती पाटील (वय ३२) आणि अजित राजेंद्र पाटील (वय २२ सर्व रा. मतकुणकी, ता.तासगाव) या तिघांना अटक करण्यात आली.
‘द कपिल शर्मा शो’मधून अर्चना सिंगचा पत्ता कट?
‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी एपिसोडमध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट डान्सरच्या परिक्षकांबरोबर हास्याची दंगल पाहायला मिळणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये जज सोनाली बेंद्रे, टेरेन्स लुईस आणि गीता कपूर आणि होस्ट जय भानुशाली दिसणार आहेत. सोनी टीव्हीने आगामी भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये सोनाली आणि अर्चना पूरण सिंग यांच्यातील मजेदार संभाषण व्हायरल होत आहे. या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.आपल्या कार्यक्रमात पहिल्यांदाच आलेल्या सोनाली बेंद्रेला कपिल चहा- कॉफी विचारतो. यावर सोनाली हसते आणि म्हणते, “मला अर्चनाची खुर्ची हवी आहे. सोनालीच्या या वक्तव्यानंतर अर्चना आश्चर्यचकित होते. तुम्ही लोकं आधी तुमची खुर्ची धरा, माझ्या खुर्चीच्या मागे का पडलाय? असा प्रश्न विचारताना दिसत आहे.
SD Social Media
9850 60 3590