शेतकऱ्यांच्या ऐकीचा मोठा विजय, मुख्यमंत्री शिदेंनी सभागृहात केली महत्त्वाची घोषणा
वेगवेगळ्या मागण्यासाठी शेतकऱ्यांचं लाल वादळ हे मुंबईच्या वेशीवर येऊन थांबलं आहे. याची दखल घेत राज्य सरकाराने चर्चा करून दिलासा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात ‘वन जमिनीबद्दल सर्व निर्णयाचे अंमलबजावणीचे आदेश आम्ही दिले आहे, शेतकऱ्यांनी आपला मोर्चा मागे घ्यावा, असं आवाहन केलं आहे.
शेतकऱ्यांच्या लाँग मार्चवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात निवेदन दिलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सभागृहातून खास आवाहन केलं.
शेतकऱ्यांना पायी मुंबईत यावं लागू नये यासाठी आम्ही दोन मंत्री त्यांच्याकडे पाठवले होतं. जे पी गावीत आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी काल आम्ही सविस्तर चर्चा केली. हे सरकार संवेदनशील सरकार आहे. शेतकऱ्यांना त्रास होई नये यासाठी आम्ही तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहे. निर्णय ही घेतले आहे, अशी माहिती शिंदेंनी दिली.
चित्रा वाघ यांना मोठा धक्का; ‘ती’ याचिका न्यायालयानं फेटाळली
भाजप नेत्या चित्रा वाघ यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चित्रा वाघ यांची याचिका फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्याविरोधात चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयानं चित्रा वाघ यांची याचिका फेटाळून आवली आहे. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी एका प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात 50 लाख रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्या दाव्याविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत असून, त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
औषध समजून आईने 4 दिवसांच्या बाळाला दिलं कीटकनाशक
खूप काळजी आणि घाई केल्याने अनेकदा गोंधळ होतो आणि त्याचा परिणाम वाईट होतो. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. एका आईने नवजात मुलाला औषधाऐवजी कीटकनाशक दिले. त्यामुळे धक्कादायक घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उर्गा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादर कला गावातील आहे. घाईघाईत मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अशी चूक केल्याने आई कुंवरबाई हिला मोठा पश्चाताप होत आहे. चार दिवसांच्या चिमुकल्या बाळाला खोकला आल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते. गुरुवारी त्रास थोडा वाढला. मुलाचे दुःख आईला सहन झाले नाही. त्यामुळे तिने घरात ठेवलेल्या काही औषधांची झडती घेतली असता तिला एक बाटली सापडली.या संदर्भात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, घटनेची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी बाळाची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. सध्या मुलाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्याची प्रकृती सामान्य झाल्यावर कुटुंबीयांची चौकशी केली जाईल.
टीम इंडियाला मिळाला ‘थलायवा’ चा आशीर्वाद! वानखेडेवर सामना पाहायला पोहोचला रजनीकांत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असून भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सामना खेळत आहे. अशातच हा सामना पाहण्यासाठी खुद्द सुपरस्टार रजनीकांत यांनी विशेष उपस्थिती लावली आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरु झाली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या टीम इंडियाच्या गोलंदाजांनी नाकीनऊ आणले. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियासाठी सलामीला आलेल्या ट्रेविस हेडची ५ धावांवर दांडी गुल झाली. त्यानंतर हार्दिक पांड्याने कर्णधार स्टीव्ह स्मिथला २२ धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर मिचेल मार्शची अर्धशतकी खेळी वगळता ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या रचता आली नाही. त्यामुळे ३५. ४ षटकांमध्ये ऑस्ट्रेलिया १८८ धावांवर सर्वबाद झाली.
‘गीतरामायण’चे स्वामित्व हक्क माडगूळकर, फडके कुटुंबीयांकडे
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायण’चे स्वामित्व हक्क (काॅपी राईट) अजूनही माडगूळकर आणि फडके कुटुंबीयांकडे आहेत. त्यामुळे ‘गीतरामायण’ कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संस्था आणि कलाकारांनी त्यांच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये, तसेच कार्यक्रम सादर होत असलेल्या व्यासपीठावरील फलकावर ग. दि. माडगूळकर विरचित ‘गीतरामायण’ असा उल्लेख ठळकपणाने करायला हवा, अशी अपेक्षा गदिमा कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
गीतरामायण हे महाकवी ग. दि.माडगूळकर यांनी रचलेले दीर्घ काव्य आहे. भारतात व परदेशात मराठी गीतरामायणाचे कार्यक्रम होत असतात. गीतरामायणाचे रूपांतरित हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ अशा विविध भाषेत कार्यक्रम होत असतात. मात्र, हलगर्जीपणामुळे गदिमा-बाबूजी नावाचा उल्लेख न करण्याचा वाईट पायंडा काही लोक पाडत आहेत. कार्यक्रमाच्या जाहिरातीत, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या फलकावर लेखक म्हणून गदिमांचा उल्लेख केला जात नाही. हे माडगूळकर कुटुंबीयांतर्फे खपवून घेतले जाणार नाही. गीतरामायण सादर होणाऱ्या प्रत्येक जाहिरात फलकावर तसेच कार्यक्रमाच्या फलकावरही ‘महाकवी ग.दि.माडगूळकर विरचित गीतरामायण’ असा उल्लेख असायलाच हवा. तसेच, संगीत सुधीर फडके असा उल्लेख असणे आवश्यक आहे, अशी मागणी गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे.
विश्वचषकापूर्वी टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार, दोन्ही संघात टी-२० सामन्यांची मालिका होणार
भारतीय संघ वनडे विश्वचषकापूर्वी आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील ही टी-२० मालिका १८ ते २३ ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार आहे. गेल्या वर्षीही टीम इंडियाने आयर्लंडचा दौरा केला होता, तर यावेळीही मालिका आयोजित केली जात आहे.क्रिकेट आयर्लंडकडून सांगण्यात आले आहे की, टीम इंडिया १८ ते २३ ऑगस्ट दरम्यान आयर्लंडसोबत तीन सामन्यांची टी-२०मालिका खेळणार आहे. मात्र, अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र सलग दुसऱ्या वर्षी टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. २०२२ मध्ये देखील, टीम इंडियाने आयरिश संघासोबत दोन सामन्यांची मालिका खेळली, जी भारताने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली २-० ने जिंकली.
SD Social Media
9850 60 3590