विमान उतरण्यापूर्वीच प्रवाशाकडून इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न; एअर होस्टेसवरही केला हल्ला

विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या विचित्र वागणुकीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वीच एका प्रवाशाने विमानाचं अपहरण झाल्याचं ट्वीट केलं होतं. दरम्यान, आता अमेरिकेतील लॉस एंजेलिसहून बोस्टनला जाणाऱ्या युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात एका ३३ वर्षीय प्रवाशाने विमान उतरण्यापूर्वीच विमानाचं इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्याने एका एअर होस्टेसवरही चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे. फ्रान्सिस्को सेवेरो टोरेस, असं या व्यक्तीचं नाव आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिसहून निघालेल्या युनायटेड एअरलाइन्सचे विमान बोस्टनमध्ये उतरण्याच्या ४५ मिनिटांपूर्वी एका प्रवाशाने विमानाचे इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अलार्म वाजल्याने एअर होस्टेसला याची माहिती मिळाली. तिने तत्काळ प्रवाशाच्या दिशेने धाव घेत हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच याची माहिती पायलट आणि क्रू मेंबर्सला दिली. मात्र, त्याने रागाच्या भरात एअर होस्टेसवर धारधार वस्तूने हल्ला केला.

दरम्यान, याप्रकरणी टोरेस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बोस्टन विमानतळावर उतरतात पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने त्याला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.