झी टाॕकीज या वाहिनीवर महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? हा सोहळा रविवार दि.26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यावेळी झी टॉकीज वाहिनीतर्फे दरवर्षी जाहीर होणाऱ्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले होते.या पुरस्कार सोहळ्यातील सर्वात लोकप्रिय चेहरा हा पुरस्कार अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने पटकावला आहे. चाहत्यांकडून तिचं कौतुक होत आहे.
हृता दुर्गुळेच्या कामाबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. हृताने दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती फुलपाखरु या मालिकेत झळकली. या मालिकेमुळेच तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. हृताने अनन्या आणि टाइमपास 3 या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. मोठ्या पडद्यावर देखील ह्रताच्या अभिनयाचे कौतुक झालं.
इन्स्टाग्रामवर ऋताचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर 25 लाख फॉलोअर्स असलेली ऋता ही एकमेव मराठी अभिनेत्री आहे असं म्हटलं जातं. दरम्यान, ऋताने दोनच दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत आजचा दिवस खास असल्याचे म्हटले होते. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तर्क वितर्क लढवले होते. अखेर तिने ती पोस्ट का केली होती हे आजच्या बातमीतून चाहत्यांच्या लक्षात आलं आहे. “आजचा दिवस फारच खास आहे”, असे कॅप्शन तिने एक फोटो शेअर करून दिले होते.
हृताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केली होती. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईत झाली. रामणारायन रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना तिला अभिनय क्षेत्राची ओढ लागली. हृता दुर्गुळे हिने ‘फुलपाखरू’ या मालिकेत वैदेही हे पात्र साकारलं. या पात्राने तिला महाराष्ट्रातल्या घरा-घरात पोहोचवलं.
ह्रता आणि प्रतिक शाहने18 मे रोजी लग्नगाठ बांधली. ह्रताने गपचूप केलेल्या लग्नाने तिच्या चाहत्यांना मोठं सप्राइज मिळालं होतं. लग्नानंतर तिनं तिचं काम सुरूच ठेवलं आहे. असं जरी असलं तरी नवऱ्यासाठी देखील वेळ काढत असते. त्याच्यासोबतचे काही फोटो व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. या दोघांची जोडी चाहत्यांची आवडती आहे.