दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज सेमीफायनाचा पहिला सामना पार पडणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय संघांमध्ये फायनल गाठण्यासाठी लढत होणार असून यापैकी एक संघ आज सामना जिंकून थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. परंतु भारताला फायनल गाठण्यासाठी तब्बल पाच वेळा महिला टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच तगडं आव्हान असणार आहे.
आज गुरुवारी 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमी फायनाचा सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळवला जाणार असून यात भारतीय महिला संघाला आपला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स दाखवावा लागेल. सेमी फायनलसाठी भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये काही बदल होण्याची देखील शक्यता आहे. आतापर्यंत यंदाच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने 4 सामने खेळले असून एकही सामना गमावलेला नाही. तर भारताने 4 ग्रुप स्टेज सामने खेळले असून यापैकी इंग्लंड विरुद्धचा सामना भारताने 11 धावांनी गमावला होता.
कधी होणार सामना :
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 23 फेब्रुवारी रोजी सेमी फायनाचा सामना रंगणार असून या सामन्याला सायंकाळी 6:30 वाजता सुरु होईल. सामन्यापूर्वी अर्धातास आधी दोन्ही संघांमध्ये नाणेफेक पार पडेल.
कुठे पाहाल सामना :
आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपचा पहिला सेमी फायनल मुकाबला स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर दाखवला जाईल. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण डिझनी + हॉटस्टार ओटीटी तसेच अँपवर सुरु राहिल.