साऊथ सुपरस्टार धनुष फक्त साऊथमध्येच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झाला आहे. त्याचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे.धनुषने बॉलिवूडमध्ये ‘रांझना’, अतरंगी रे’सारखे मोठ्या बॅनरचे सिनेमे केले आहेत.अभिनेत्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खाजगी आयुष्यबाबतही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
धनुषबाबत एक बातमी समोर आली आहे. जी ऐकून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.अभिनेत्याने नुकतंच चेन्नईमध्ये आपल्या आईवडिलांसाठी आलिशान घर खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर धनुषने आपल्या आई वडिलांना हे सरप्राईज दिलं आहे.धनुषने आईबाबांसाठी घेतलेल्या या घराची किंमत थोडी-थोडकी नसून तब्बल 150 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.सोशल मीडियावर सध्या या नव्या घराच्या पूजेचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्याची फॅमिली पारंपरिक अंदाजात दिसून येत आहे.