‘आदेश बांदेकर यांची हकालपट्टी..’ मनसेची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
मागील काही दिवसांपासून मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. सिद्धिविनायक मंदिराबाबत झालेल्या आरोप खोटे आहेत, त्यात काही तथ्यं नाही, असे म्हणत आदेश बांदेकर यांनीही त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. तसेच आरोप करणारे मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांचा नक्कलधारी असा उल्लेख केला होता. आता पुन्हा एकदा यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकर यांच्यावर हल्ला करत त्यांची पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! आधी कर्णधार अन् आता आणखी दोन खेळाडू परतणार मायदेशी
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-० ने पिछाडीवर आहे. दरम्यान, 1 मार्चला होणाऱ्या तिसऱ्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्स त्याच्या वैयक्तिक कारणामुळे ऑस्ट्रेलियाला परतला आहे. त्यानंतर आता आणखी दोन खेळाडु दुखापतीमुळे मायदेशी परतणार आहेत. कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी उपलब्ध असणार आहे ही जमेची बाब आहे.
ऑस्ट्रेलियाला पुढच्या दोन कसोटी सामन्यात अडचणींचा डोंगर आणखी वाढणार आहे. डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हासुद्धा पॅट कमिन्ससोबत मायदेशी परतला आहे. वॉर्नरला दुसऱ्या कसोटीवेळी दुखापत झाली होती तर हेजलवूड हा जुन्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही.
दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले, भारताकडे आज शेवटची संधी
महिला टी२० वर्ल्ड कप २०२३ मध्ये गट फेरीतील सामने अखेरच्या टप्प्यात आहेत. मात्र आतापर्यंत केवळ दोनच संघांनी सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. यातील एका संघाने रविवारी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आयसीसीने सोमवारी घोषणा केली की, पाच वेळा विजेता असलेल्या ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडचा संघही सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. इंग्लंड बी ग्रुपमध्ये असून भारतही याच गटात आहे. भारत अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहे.
भारताचा आज गट फेरीतला अखेरचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. जर या सामन्यात भारताने विजय मिळवला तर सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत तिसरा संघ ठरेल. भारतीय संघाला महिला टी२० वर्ल्ड कपची सेमीफायनल गाठायची असेल तर कोणत्याही परिस्थिती टीम इंडियाला विजय मिळवावा लागेल. भारताने हा सामना जिंकला तर ६ गुण होतील आणि इंग्लंडसोबत सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित होईल. जर भारत पराभूत झाला तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील.
दिल्ली-देवघर इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची माहिती, विमानतळावर खळबळ
दिल्लीवरून देवघरला (झारखंड) जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे विमान लखनौला वळवण्यात आलं. दिल्लीवरून निघालेल्या या इंडिगो विमानाचा नंबर ६-ई ६१९१ असा आहे. या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर या विमानाचं लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या प्रकरणाची माहिती देताना इंडिगोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, “सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून विमान लखनौ विमानतळावर उतरवण्याची परवानगी देण्यात आली. आम्ही सुरक्षा यंत्रणांच्या नियमांचे पालन करत आहोत.”
काँग्रेसबाबत चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर कंगना रणौतने राहुल गांधींची उडवली खिल्ली
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत कायमच चर्चेत असते. कंगना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील घडामोडींवर कंगना बिनधास्तपणे व्यक्त होताना दिसते. अनकेदा कंगनाच्या वक्तव्यांमुळे वादही होताना दिसतात. यामुळेच तिच्या ट्वीटर अकाऊंटवरही बंदी घालण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच कंगना ट्वीटरवर परतली आहे.कंगनाने तिच्या चाहत्यांसाठी नुकतंच ट्वीटरवर #AskKangana सेशन घेतलं होतं. चाहत्यांच्या प्रश्नांना कंगनाने या सेशनमधून उत्तरं दिली. एका ट्वीटर अकाऊंटवर कंगनाला काँग्रेस नेते राहुल गांधींबाबत प्रश्न विचारण्यात आला. “काँग्रेस व राहुल गांधीबाबत कोणीतरी बोलत असताना तू ऐकल्यावर त्याबाबत तुझ्या मनात काय विचार येतात?” असं विचारण्यात आलं. कंगनाने चाहत्याच्या या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधीना छोट्या मुलाची उपमा दिली आहे. “ओले ओले…शो शो स्वीट” असं कंगनाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. कंगनाचं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.
पृथ्वी शॉवर हल्ला करणाऱ्या सपना गिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर हल्ला केल्याचा आरोप असलेली सोशल मीडिया इन्फ्लुईन्सर सपना गिल हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पृथ्वी शॉवर हल्ला केल्याचा आरोप सपना गिलवर आहे. सोमवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर सपना गिलची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुरू होणार आहे. मुंबईतील घटनेनंतर ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (१४३, १४८, १४९, ३८४, ४३७, ५०४, ५०६) विविध कलमांखाली अटक केलेल्या ८ लोकांपैकी सपना ही एक आहे.कथित गुन्ह्यात वापरलेली बेसबॉल बॅट आणि वाहन शोधण्याची गरज असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढवून मागितली होती. पृथ्वी शॉचा मित्र आशिष सुरेंद्र यादव याने फिर्याद दिल्यानंतर मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी सपना गिलसह इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत आशिषने म्हटले आहे की, काही लोकांनी त्याच्या कारवर बेसबॉल बॅटने हल्ला केला. त्यानंतर कारचा पाठलाग केला आणि ५०,००० रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास खोट्या केसची धमकीही दिली.
SD Social Media
9850 60 3590