महादेवाचं दिव्य रुप पाहून पार्वतीच्या आईची झाली होती अशी अवस्था; विवाहाला केला विरोध अन्..

महादेवाच्या दर्शनाने सर्व भक्तांचे मन प्रसन्न होते, त्याच्या उपासनेने माणसाला सुख, दुःख, रोग, भय इत्यादीपासून मुक्ती मिळते, ज्याच्या दर्शनासाठी प्रभू राम स्वतः तळमळतात, अशा भूतभावन भोलेनाथाला पाहून कोणाला भीती वाटेल का? नाही ना! मग असं काय झालं असेल की, महादेवाला पाहून त्यांची सासू मैना या बेशुद्ध पडल्या होत्या. महादेव देवी पार्वतीच्या घरी लग्नाची वरात घेऊन आले असताना हा प्रकार घडला, अशी पौराणिक कथा आहे. शिवाला भूतनाथ का म्हणतात, हे त्यादिवशी त्यांची वरात पाहिल्यानंतर स्पष्टपणे कळले. कारण, या वरातीमध्ये दकनी, शकिनी, भूत, प्रेत, यतुधान, वैताळ, पिशाच, ब्रह्मराक्षस आदींचा समावेश होता. याशिवाय नंदी, भैरव, यक्ष, गंधर्व, क्षेत्रपाल, दिग्पाल इत्यादी भोलेनाथांचे गणही आले होते.

पुराणानुसार, विष्णू-लक्ष्मी, ब्रह्माजीं-ब्राह्मणी, इंद्राणीसह इंद्रदेव इत्यादी इतर देवता आपापल्या वाहनांवर सुंदर वस्त्रे आणि दागिने परिधान करून भोलेनाथांच्या लग्नाच्या साक्षीसाठी आले होते.

जावयाला पाहून देवी मैना बेशुद्ध –

दारात जावयाची आरती करण्यासाठी पार्वती मातेच्या आई मैना समोर आल्या. त्यांचेही मन शिवाच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. पण, सिंहाचे कातडे घातलेले, भस्माने माखलेले, निळे कंठ, कानात विंचू कुंडल घातलेले, गळ्यात सापांची माळ घातलेले भगवान भोलेनाथ आणि मागची वरात पाहताच मैनादेवींच्या हातातून आरतीचे ताट खाली पडले आणि त्या बेशुद्ध झाल्या. महादेवाला सर्व काही समजले.

आई पार्वतीला मिठी मारतात –

त्यानंतर माता मैना यांना उचलून त्यांच्या खोलीत आणण्यात आलं, त्यांना प्यायला पाणी देण्यात आलं, शुद्धीवर येताच त्यांनी आपल्या पतीला महादेवाशी पार्वतीचे लग्न न करण्याविषयी खूप समजावले आणि पार्वतीला मिठी मारली आणि म्हणाल्या की, मी पार्वतीला घेऊन एकवेळ डोंगरावरून उडी मारेन, पण त्या भयंकर चांडाळाशी मी तिचे लग्न होऊ देणार नाही.

पार्वतीने केली शिवाची प्रार्थना –

लग्न मोडत असल्याचे पाहून पार्वती दुःखी झाली आणि त्यांनी शंकराला त्यांच्या साधारण पूर्व रुपात येण्यासाठी प्रार्थना केली आणि भोलेनाथानेही लगेच त्यांची विनंती मान्य केली.

शिव-पार्वती विवाह संपन्न झाला –

खूप समजावून सांगितल्यावर मैना देवी पुन्हा एकदा आरती करायला बाहेर आल्या आणि यावेळी भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांना खूप आनंद झाला आणि त्यानंतर शिव-पार्वती विवाह पूर्ण विधी संपन्न झाला.

 (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. sdnewsonline त्याची हमी देत नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.