सावधान! दिवाळीआधी नागपुरात मोठी कारवाई, 20 लाख किमतीचे भेसळयुक्त पदार्थ जप्त

दिवाळी अगदी काही दिवसांवर आलेली आहे. अशात या काळात खाद्य पदार्थांची मागणी आपोआपच वाढते. त्यामुळे या काळात भेसळयुक्त पदार्थ बाजारात येण्याचं प्रमाणही भरपूर असतं. अशातच आता नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. यात अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपुरमध्ये मोठी कारवाई करत 20 लाख रुपये किमतीचे संशयित भेसळयुक्त पदार्थ जप्त केले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाने याठिकाणी 20 लाख किंमतीचे 10 हजार 800 किलो अन्न पदार्थ भेसळीच्या संशयवरून जप्त केले आहेत. यात खावा, खाद्यतेल, तूप, वनस्पती तेल, रवा, नमकीन या पदार्थांचा समावेश आहे. विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाने 16 ठिकाणी धाड ठाकून ही कारवाई केली आहे. जप्त केलेले नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पदार्थांवर कारवाई केली.

बुधवारीच मुंबईतही तीन लाख रुपयांचं संशयित भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं होतं. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली होती. मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागाला 18 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार मस्जिद बंदर इथल्या ऋषभ शुद्ध तूप भांडार गोडाऊनवर ही कारवाई करण्यात आली. गोदामातून 2 लाख 99 हजार 90 रुपये किंमतीचं 400 किलो तूप जप्त करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.