विशाखापट्टनम हे शहर आता आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या नवाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टनम येथे स्थलांतरित केली जाणार आहे. रेड्डी यांनी सांगितलं की, ते त्यांचं कार्यालय विशाखापट्टनम येथे स्थलांतरित करणार आहेत.
आंध्र प्रदेश सरकारने २३ एप्रिल २०१५ रोजी अमरावती शहर आपली राजधानी म्हणून घोषित केलं होतं. २०२० मध्ये राज्य सरकारने तीन शहरं राजधानी म्हणून बनवण्याची योजना आणली होती. ज्यामध्ये अमरावती, विशाखापट्टनम आणि कुरनूल या शहरांचा समावेश होता. त्यानंतर ही योजना मागे घेण्यात आली आणि अमरावती हेच शहर आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून कायम राहिलं.
अमरावती हे शहर कथित जमीन घोटाळ्याचं केंद्र म्हणून प्रसिद्ध झालं होतं. रेड्डी यांचा पक्ष वायएसआरसीपीने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यावर जमीन घोटाळ्यासह वेगवेगळे आरोप केले आहेत.