उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत सोमवारी संपणार आहे. सध्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळे तेथील निर्णय आल्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांची २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी निवड झाली. ही सोमवारी संपत आहे. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे गेला आहे. यावर ३० जानेवारी सुनावणी आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी आयोगाचा निर्णय होऊ शकतो. याबाबत खासदार अनिल देसाई म्हणाले, की ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदासाठी मुदतवाढ द्यावी आणि पक्षांतर्गत निवडणुका घेऊ द्याव्यात, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली आहे. त्यावर त्यांनी निर्णय दिलेला नाही. सोमवारी मुदत संपत असल्याची बाब तांत्रिक आहे. आयोगाच्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरविली जाईल. आयोगाचा निर्णय काहीही झाला, तरी उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख आहेत, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी ठणकावले.