उद्योग मंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले, भर समुद्रात स्पीड बोटीने दिला दगा

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत रायगड जिल्ह्यातील मांडवा इथून मुंबईत गेट वे ऑफ इंडिया असा स्पीड बोटीने प्रवास करताना थोडक्यात बचावले. भर समुद्रात त्यांची बोट बंद पडली होती. स्पीड बोटीची सर्व यंत्रणा बंद पडल्यानंतर बोटीच्या कॅप्टनला रेस्क्यूसाठी SOS हा आपत्कालीन संदेशसुद्धा पाठवता येत नव्हता.

समुद्रात अचानक ओढवलेल्या या संकटात प्रसंगावधान राखत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या स्वीय सहायकाने दुसरी स्पीड बोट बोलवली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे. भर समुद्रात अशा संकट प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या स्विय सहाय्यकाने मोबाईलची रेंज कमी असतानाही तात्काळ प्रयत्नं करून दुसरी स्पीड बोट मागवली. दुसरी बोट काही वेळातच घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाली. त्यामुळे भर समुद्रात भरकटत चालेल्या स्पीड बोटीला दूसऱ्या बोटीने भर समुद्रात बचाव कार्य करत उद्योग मंत्री उदय सामंत यांना सुखरूप परत आणले.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत अलिबाग ते मुंबई असा प्रवास स्पीड बोटीने करत होते. समुद्रात प्रवासा दरम्यान यांच्या स्पीड बोटीचे इंजिन बंद पडले. समुद्रातील लाटांमुळे स्पीड बोट भरकटली. बंद पडलेल्या स्पीड बोटीच्या सर्व यंत्रणा बंद पडल्यामुळे बोटीच्या कॅप्टनला तात्काळ SOS हा आपत्कालीन संदेश सर्व सुरक्षा यंत्रणांना पाठवणे कठिण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.