‘…हे एका पंतप्रधानाला शोभत नाही’, राज ठाकरेंची मोदींवर थेट टीका

 ‘मीच त्यावेळी बोलतो होते. माझं आजही म्हणणं आहे, देशाचे पंतप्रधान मोदी यांनी देशाकडे लक्ष द्यावे. देशातील प्रत्येक राज्य हे समान मुलासारखं असलं पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत म्हणून गुजरातला प्राध्यान्य देणे हे एका पंतप्रधानाला शोभत नाही. माझं त्यावेळी म्हणणं होतं, आजही तेच म्हणणं आहे, असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

‘व्यंग ,वास्तव आणि राजकारण’ या विषयावर 18 वे जागतिक मराठी साहित्य संमेलनात शोध मराठी मनाच्या या परिसंवादात राज ठाकरे यांची प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली.

‘त्यावेळी मनमोहन सिंग आहे. उद्या ते पंतप्रधान झाले तर ते पंजाबला प्रकल्प घेऊन जातील. उद्या तामिळनाडूचा व्यक्ती पंतप्रधान झाला तर तिकडे घेऊन जाईल का. माझी 2014 ची भाषण काढून पाहा, पंतप्रधान झाल्यावर मोदींनी पहिली पाच वर्ष उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारकडे लक्ष द्यावं असं मत मांडलं होतं. त्यात अनेक विषय आहे. जर त्या माणसाने चांगलं काम केलं त्याचं अभिनंदन करण्याचा मोकळेपणा सुद्धा तुमच्यमध्ये असला पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.

2014 नंतर ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या तशा झाल्या नाही म्हणून लाव रे तो व्हिडीओ म्हणत सभेतून व्हिडीओ दाखवले. 370 कलम रद्द होणे, राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागणे हे चांगले विषय सुद्धा झाले आहे. मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

मी आझाद मैदानामध्ये मोर्चा काढला होता. त्यानंतर आता भोंगा आंदोलन सुद्धा केलं. परिवर्तन सुद्धा झालं पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी एकमेकांना शिव्या घालत होते, ते आज एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहे. त्यांना विचारांना अचानक हा बदल कसा झाला. प्रश्न असा आहे, एकमेकांविरोधात जायचं आणि सकाळी 6 वाजता जाऊन शपथ घ्यायची. मग त्यांच्याविरोधात बसायचं. मग त्यांच्याशी गोडगोड बोलायचं. या सगळ्या गोष्टी मी व्यंगचित्रकार म्हणून बोलतोय, मी बैलासारखा बोथत विचार करत नाही. कारण बैल चालता चालता मुततो. मी जो विचार करतो, जे चांगलं आहे, त्याला चांगलं म्हणतो. जे वाईट आहे त्याला वाईट म्हणतो, असंही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

मी कडवट मराठी घरात जन्म घेतला आहे. त्यामुळे मी फारकत घेणे शक्य नाही. आता पाकिस्तानी कलावंताना ज्यावेळी हाकलून दिलं. त्यावेळी सो कॉल्ड हिंदुत्वावादी कुठे होते. लाथा आम्ही घातल्यात ना. परत नाही ना आले. आता परतही चित्रपटही प्रदर्शित करायचं ठरवलं, विरोध केल्यानंतर भारतात बंद झाला आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.