अवतार 2 रिलीज होण्याआधीच हिट; ओपनिंग डे ला इतके करोड कमावण्याची शक्यता
जगभरातील प्रेक्षक मागच्या काही महिन्यांपासून एका सिनेमाची आतूरतेनं वाट पाहत होते तो सिनेमा म्हणजे ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’. हा सिनेमा अखेर आज 16 डिसेंबरला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. 2009साली आलेल्या ‘अवतार’चा ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ हा सिक्वेल आहे. पहिल्या ‘अवतार’ला संपूर्ण जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता त्याच्या सिक्वेलची ही प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते. ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’च्या रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच प्रेक्षकांनी एडवान्स बुकिंग करत उत्साह दाखवला होता. गुरूवारी ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’साठी 30 करोडचं एडवान्स बुकींग झालं होतं. बॉक्स ऑफिसवर ‘अवतार 2’ नवा इतिहास निर्माण करेल यात काही शंका नाही. शनिवारी आणि रविवारसाठी देखील मोठ्या प्रमाणात एडवान्स बुकींग करण्यात आलं आहे. ‘अवतार 2’ हा आतापर्यंतचा जगातील सर्वात महागडं बजेट असलेला सिनेमा आहे.
अवतार 2 भारतात केवळ एडवान्स बुकींगवर जवळपास 40-50 करोडची कमाई करण्याची शक्यता आहे. देशातील आतापर्यंतची सर्वाधिक एडवान्स बुकींग करणाऱ्या एवजेर्स सिनेमाला देखील अवतार 2 मागे टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अवतार 2 हा सिनेमा भारतात हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे तमिळ, तेलूगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही सिनेमा पाहायला मिळणार आहे. देशभरात सिनेमासाठी 3800हून अधिक स्क्रिन्स लावण्यात आले आहेत. दरदिवशी सिनेमाचे 17000 हून अधिक शो लावण्यात आले आहेत.
इलॉन मस्कचा श्रीमंतीचा मुकुट गेला! 73 वर्षीय उद्योगपतीने मिळवली गादी
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अरनॉल्ट 171 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे, तर मस्क 164 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.बर्नार्ड अरनॉल्ट हे LVMH Moët Hennessy चे CEO आहेत, ही जगातील सर्वात मोठी लक्झरी गुड्स कंपनी आहे. अरनॉल्ट आणि त्याच्या कुटुंबाची LVMH मध्ये 47.5 टक्के हिस्सेदारी आहे. या आलिशान हाऊसकडे सध्या 70 पेक्षा जास्त ब्रँड आहेत.
सांगली ; अख्खं गावच आहे शाकाहारी, लग्नानंतर मुलीही सोडतात मांसाहार
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये रेणावी नावाचे गाव शुद्ध शाकाहारी म्हणून ओळखले जाते. गावात शेकडो वर्षापासून मांसाहार केला जात नाही. या गावांमध्ये प्रसिद्ध आणि पवित्र रेवणसिद्धीचं देवस्थान आहे त्यामुळे इथले दोन ते अडीच हजार लोकसंख्येचे गाव शाकाहारी आहे. लग्नानंतर शाकाहारी राहावे लागेल असं बोलणं करूनच महिलांना गावात यावं लागत.
सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यातील रेणावी या गावाची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात शाकाहारी गाव म्हणून झाली आहे. या गावची लोकसंख्या 2,382 आहे. डोंगर कपारीत वसलेल्या या शाकाहारी गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारं श्री रेवणसिद्ध नाथांचं पवित्र स्थान. नवनाथांपैकी एकनाथ हे स्वयंभू आणि अतिशय जागृत असलेल मंदिर आहे. अनादी काळापासून ही शाकाहारी भूमी म्हणून ओळखली जाते.
बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, भाजपने मिळवली एक हाती सत्ता
बीड जिल्ह्यात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत एक हाती सत्ता मिळवली आहे. धारूर बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. ग्रामपंचायत मतदार संघात 72 तर सोसायटीतील उमेदवारांनी 60 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचा हा एक हाती विजय असल्याने आ. प्रकाश सोळंके यांना मोठा धक्का मानला जात आहे.
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या अगोदर स्थानिक सहकारी संस्थेमधील बाजार समिती ताब्यात आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुलाल लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
पाच वर्षात फक्त 8 कसोटीत संधी, कुलदीपचे 22 महिन्यांनी पुनरागमन अन् केला विक्रम
तब्बल 22 महिन्यांनी कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या कुलदीप यादवने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फलंदाजीसह गोलंदाजीतही कमाल केली आहे. पदार्पण केल्यानंतर पाच वर्षात त्याला फक्त 8 कसोटीत संधी मिळाली आहे. त्याने जवळपास दोन वर्षांनी पुनरागमन केलं आहे. बांगलादेशविरुद्ध भारतीय फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी त्याने नोंदवली. कुलदीपने पहिल्या डावात त्याच्या कारकिर्दीत एका डावात सर्वाधिक 40 धावा केल्या. त्यानंतर 40 धावात 5 गडी बाद केले. कुलदीपच्या 5 विकेटच्या जोरावर भारताने बांगलादेशला पहिल्या डावात फक्त 150 धावात गुंडाळलं.
कुलदीपने इबादतला बाद करत आपल्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा एका डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली. कुलदीप यादव 22 महिन्यानंतर कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. यात त्याने सर्वोत्तम अशी कामगिरी करताना 40 धावा देत पाच गडी बाद केल्या. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 55.5 षटकेच खेळू शकला.
इस्रोने केली बक्कळ कमाई, पाच वर्षात केले १९ देशांचे १७७ उपग्रह प्रक्षेपित
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो ( ISRO ) ही जगात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील एक आघाडीची संस्था म्हणून ओळखली जातो.अजूनही जगात हातावर मोजता येतील इतक्या मोजक्या देशांनाच स्वबळावर कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवणे शक्य झाले आहे. इस्रो ही सरकार नियंत्रित संस्था आहे. मंगळयान,चांद्रयान अशा मोहिमांमुळे जगात इस्त्रोचे नाव आदराने घेतले जात असून अत्याधुनिक उपग्रह बनवणारी संस्था म्हणूनही इस्त्रोचा लौकिक आहे. एवढंच नाही तर जगात सर्वात स्वस्तात उपग्रह पाठवणारी संस्था म्हणूनही इस्रोची आणखी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.एकेकाळी स्वःताचे उपग्रह दुसऱ्या देशांच्या सहाय्याने बनवत अवकाश पाठवण्यासाठी त्यांचेच सहाय्य घेणारी इस्रो आज फक्त स्वतःचेच नाही तर इतर देशांचे उपग्रह अवकाशात पाठवत आहे. गेल्या काही वर्षात इतर देश त्यांचे उपग्रह, जगभरातील विद्यापीठ तसंच संशोधन संस्था उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी भारताच्या या इस्रोकडे रांग लावून येत आहेत. म्हणूनच असे उपग्रह प्रक्षेपित करत, अवकाशात अचूकरित्या पाठवत इस्रोने आता बक्कळ कमाई करायला सुरुवात केली आहे.जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०२२ या पाच वर्षात १९ देशांचे आणि त्यांमधील विविध संस्थांचे तब्बल १७७ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामधून ९४ दशलक्ष डॉलर आणि ४६ दशलक्ष युरो एवढे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच एकुण तब्बल एक हजार १०० कोटी रुपये कमावले आहेत.
पंतप्रधान जावयाला भेटण्यासाठी नारायण मूर्ती, सुधा मूर्ती ब्रिटनला जाणार?
भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सासू-सासरे आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती, सुधा मूर्ती लवकरच ब्रिटनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यात आहे. पंतप्रधान सुनक यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या १० डाऊनिंग स्ट्रीटला मूर्ती दांपत्य भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. ४२ वर्षीय ऋषी सुनक यांनी नारायण आणि सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तींशी लग्न केलं आहे. सध्या पंतप्रधानपदी विराजमान असलेले सुनक हे १० डाऊनिंग स्ट्रीट या ब्रिटीश पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानात आपली पत्नी आणि दोन मुली कृष्णा, अनुष्काबरोबर वास्तव्यास आहेत.
शुबमन-पुजाराची शानदार शतके! भारताने केला डाव घोषित, विजयासाठी बांगलादेशसमोर ५१३ धावांचा डोंगर
भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर संमिश्र कामगिरी करताना दिसत आहे. या दौऱ्यात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताला १-२ ने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर भारत विरुद्ध बांगलादेश संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सध्या खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा स्टार युवा फलंदाज शुबमन गिल याने शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील पहिलेच शतक होते. भारत-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमानांना फॉलो-ऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेत विजयासाठी बांगलादेशसमोर ५१३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.
प्रसिद्ध अवॉर्डच्या नामांकन यादीवरून भडकले लेखक क्षितिज पटवर्धन
मराठी सिनेसृष्टीत काही अवॉर्डची प्रेक्षकांप्रमाणे कलाकार देखील आतूरतेनं वाट पाहत असतात. असाच एक अवॉर्ड म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या अवॉर्डचा नामांकन सोहळा नुकताच संपन्न झाला. वर्षभरातील सिनेमांची, कलाकारांची नावं या अवॉर्डसाठी नामांकित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण अवॉर्डसाठी फेवरेट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, गायक, चित्रपट, गीत गायक, गायिका, नायिका खलनायिका अशा अनेक कॅटरेगीमध्ये अनेकांना नामांकन मिळाली मात्र यात फेवरेट लेखक आणि गीतकार नामांकन देण्यात आलेली नाहीत. या नामांकनावर प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पोस्ट शेअर टोला लगावला आहे.
SD Social Media
9850 60 3590