बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यानेही आता मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स स्वयंसेवी संस्थेकडे सोपवली आहेत. खुद्द जॉन यांने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
जॉनने लिहिले की, ‘सध्या आपला देश बर्याच संकटांशी लढा देत आहे. प्रत्येक मिनिटाला असे बरेच लोक आहेत ज्यांना ऑक्सिजन, आयसीयू बेड, लस आणि खाण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. तथापि, या कठीण काळात आपण सर्वजण एकमेकांना आधार देत आहोत.
जॉनने पुढे लिहिले की, ‘आजपासून मी माझी सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स आमच्या भागीदार स्वयंसेवी संस्थेकडे सोपवत आहे. माझ्या अकाऊंटवर आता केवळ अशीच सामग्री पोस्ट केली जाईल, ज्यामुळे गरजू लोकांना मदत होईल. ही समस्या दूर करण्यासाठी मानवतेचा प्रसार करण्याचा काळ आहे. या युद्धात जिंकण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करूया. घरी रहा आणि सुरक्षित रहा.’
जॉन अब्राहम याचा आगामी चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’ चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता उद्रेक पाहून निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या रिलीजच्या तारखेनुसार जॉनची बॉक्स ऑफिसवर सलमान खानशी ‘टक्कर’ होणार होती. वास्तविक, जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट सलमान खानचा चित्रपट ‘राधे’ बरोबर प्रदर्शित होत होता. ही टक्कर पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्साही झाले होते, पण आता ‘सत्यमेव जयते 2’ची रिलीज डेट बदलली आहे, ही स्पर्धा देखील टाळण्यात आली आहे.