सहायता फंडात निधी देण्याबाबत शरद पवार यांची सूचना

महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मोठी मदत जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) पेटारा उघडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री सहायत फंडात निधी देण्याबाबत पक्षाला सूचना केल्या. त्यानुसार राष्ट्रवादीने दोन कोटी रुपयांचा निधी सीएम फंडात दिला आहे.

लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे आवाहन जयंत पाटील यांनी केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार तसेच सर्व खासदार एक महिन्याचे वेतन सीएम फंडात देणार आहेत. लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे आवाहन, जयंत पाटील यांनी केलं.
महाराष्ट्रात व्यापक लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाचा खर्च तसेच राज्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहीजे यादृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आज 1 कोटी आणि आमदार, खासदार यांचे महिन्याचे वेतन मिळून 1 कोटी असे दोन कोटी रुपये राष्ट्रवादीकडून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.