सिनेसृष्टीतील ‘हॅप्पी गो लकी’ अभिनेता म्हणजे पुष्कर क्षोत्री. सिनेमा असो, नाक, मालिका किंवा सूत्रसंचालन ह्या सर्व आघाड्या तो लिलया पार पाडतो. विनोदी अभिनेता म्हणून तो प्रसिध्द आहे. पुष्कर क्षोत्रीने आजवर पंचवीसहून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले आहे. मुख्यत्वे विनोदी भूमिकांसाठी तो ओळखला जातो. हापूस, एक डाव धोबीपछाड, झेंडा, मोरया, अ पेइंग घोस्ट, कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील त्याचा अभिनय रसिकांना वाखाणला आहे. रेगे या चित्रपटातून त्याने रंगवलेला इन्स्पेक्टर त्याच्या अभिनयाची दुसरी गंभीर बाजूही दाखवून जातो. ह्या भूमिकेसाठी त्याला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? चा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. हिंदीमधील मुन्नाभाई एम.बी.बी.एस. आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील त्याचे प्राध्यापक डॉक्टरचे पात्रही रसिकांच्या आजही लक्षात आहे. पुष्कर क्षोत्री याने दिलीप प्रभावळकर यांनी गाजवलेले ‘हसवाफसवी’ या नाटकाचे प्रयोग पण गाजवले आहेत. त्यातील त्याच्या सहा वेगवेगळ्या भूमिका एकदम अप्रतिंम आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचा कोणताही पारितोषिक वितरण सोहळा असो किंवा कॉमेडी शो, सध्या एक मराठी कलावंताने सर्वदूर हे क्षेत्र व्यापले आहे. तो म्हणजे पुष्कर क्षोत्री. पुष्कर क्षोत्री याने आजपर्यंत अनेक महत्वाच्या मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. टी,व्ही वरील फू बाई फू , स्मार्ट सूनबाई हे त्याचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाले होते. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘सावज’, ‘भूल’, ‘सांजसावल्या’, ‘अवंतिका’, ‘वादळवाट’, ‘अभिलाषा’, ‘दौलत’, ‘अर्धांगिनी’, ‘व्हील स्मार्ट सुनबाई’, ‘टिकल ते पोलीटिकल’, आदि मालिका पण त्याच्या अभिनयाचं विशेष कोतुक झाले आहे.