CJI चंद्रचूड यांनीही केलंय मूनलाइटिंग; ऑल इंडिया रेडिओवर करायचे खास काम
गेल्या काही महिन्यांपासून मूनलाइटिंग हा शब्द खूप चर्चेत आला होता. आता तर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी देखील कधीकाळी मूनलाइटिंग केल्याचं समोर आलं आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात ते ऑल इंडिया रेडिओवर मूनलाइट करायचे. यात अनेक कार्यक्रमांचे अँकरींग आणि होस्टींग केलं आहे. अयोध्या आणि सबरीमालासारख्या मोठ्या निर्णयांमध्ये डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात कनिष्ठ वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली होती.गोव्यातील बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या पुढाकाराने आयोजित इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्चच्या पहिल्या शैक्षणिक सत्राचे उद्घाटन केल्यानंतर डीवाय चंद्रचूड बोलत होते.
पोलंड फिफातून आऊट
फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये रविवारी पोलंड आणि फ्रान्स यांच्यात प्री क्वार्टर फायनल सामना झाला. यामध्ये फ्रान्सने पोलंडवर ३-१ अशा गोल फरकाने विजय मिळवला. तर या पराभवानंतर पोलंडचा गोलिकीपर वोएशेख स्टेंशनेच्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पराभवानंतर हमसून रडणाऱ्या या चिमुकल्याच्या व्हिडीओनंतर आमच्याही डोळ्यात पाणी आलं अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.फ्रान्सकडून किलियान एम्बाप्पेने दोन गोल नोंदवले. यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत एम्बाप्पे अव्वल स्थानी आहे.
‘तुमचा जन्म पाकिस्तानात झाला का?’, शिंदेंचा आमदार प्रसाद लाडांवर भडकला
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेते छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यपालांनंतर सुधांशू त्रिवेदी आणि मग प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं विधान प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात केलं.प्रसाद लाड यांच्या या विधानाचा फक्त विरोधकच नाही तर शिंदे गटाच्या आमदारांनीही चांगलाच समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता संजय गायकवाड यांनीही प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला का? हे तपासावं लागेल, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला.
युनायटेड नेशन फेलोशिपसाठी आशिया खंडातून फक्त नाशिकच्या मुलीची निवड
मयुरी धुमाळ यांच्या रूपाने नाशिकच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.युनायटेड नेशन फाउंडेशनच्या डेटा व्हॅल्यू अडव्होकेट फेलोशिपसाठी मयुरी धुमाळ यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे जगभरातून फक्त सात व्यक्तींची या फेलोशिपसाठी निवड झाली त्यात मयुरी यांचं नाव असल्यामुळे संपूर्ण देशासाठी ही गौरवाची बाब आहे. आशिया खंडातून एकमेव विद्यार्थिनी म्हणून मयुरी प्रतिनिधित्व करणार आहे. या फेलोशिपसाठी जगभरातून 65 हून अधिक देशांमधून सुमारे 400 पेक्षा अधिक अर्ज केले गेले होते.
महामार्गाच्या भरावामुळे पुराचा धोका वाढला
कृष्णा आणि वारणा नदीच्या वाढत्या महापुरास महामार्गासह अनेक रस्त्यांचे भराव कारणीभूत ठरतात, असा निष्कर्ष अनेकांनी काढला आहे. विशेषतः रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मिरज अंकली दरम्यानच्या भरावाचा फटका गतवर्षीच्या महापुरावेळी बसला होता. त्यानंतर हे काम करताना जागोजागी पाणी वाहून जाण्यासाठी कप्पे (बॉक्स) सोडावेत, अशी मागणी झाली होती. त्यावर समिती स्थापन करून अहवाल सादर झाला. मात्र, त्या अहवालाकडे केंद्राने दुर्लक्ष केले. त्यामुळे या महामार्गामुळे पूर येण्याचा धोका अधिक वाढलेला आहे.
रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे भव्यदिव्य काम महापुराचे संकट वाढवणारे ठरल्याचे दिसून आले होते. महापूर काळात पाण्याचा प्रवाह आयर्विन पूल ते हरिपूर रस्त्यावरील लिंगायत स्मशानभूमी परिसरातून सांगली शहरात शिरतो. रस्ते महामार्गांचे भराव टाकताना महापूर काळातील बदलणाऱ्या नदी प्रवाहांचा विचार केला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी नोंदवले होते.
माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार, अज्ञात व्यक्तीनं कुत्र्याच्या पिल्लांना जाळून मारलं
बहुतेक लोकांना कुत्रा आणि मांजर पाळायला आवडतात. त्यातही कुत्रा पाळणाऱ्यांची संख्या जरा जास्तच आहे. अनेकजण घरामध्ये कुत्रा पाळला नसेल, तर रस्त्यावर दिसणाऱ्या भटक्या कुत्र्यांना खाण्यासाठी अन्न देत असतात. मात्र, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका अज्ञात व्यक्तीनं एका कुत्र्याला विष देऊन मारून टाकलं असून त्याच्या तीन पिल्लांना जाळून मारले आहे. या घटनेनंतर प्राणीप्रेमींमध्ये संताप असून त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘आजतक’ने याबाबत वृत्त दिलंय.
भोपाळमधील चिनार पार्कमध्ये माणुसकीला लाजवेल, अशी घटना समोर आलीय. येथे एका अज्ञात व्यक्तीनं एक कुत्रा आणि त्याच्या तीन पिल्लांना निर्दयपणे मारून टाकले. त्यानं कुत्र्याला विष देऊन तर त्याच्या पिल्लांना जाळून मारले. या घटनेबाबत अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या असून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘वडिलांना किडनी देण्याची संधी मिळणं हे माझं नशीब!’ लालू प्रसाद यादवांच्या मुलीची भावनिक पोस्ट
वडील आणि मुलीच्या नात्यात एक वेगळ्याच प्रकारचा भावनिक ओलावा असतो. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे ‘हिरो’च असतात. आपल्या या हिरोसाठी मुलगी काहीही करू शकते. मग ती मुलगी सामान्य कुटुंबातील असो किंवा प्रसिद्ध राजकारणी घराण्यातील. माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या धाकट्या मुलीनं हे सिद्ध करून दाखवलं आहे.
अनेक दिवसांपासून विविध आजारांनी त्रस्त असलेले आणि रुग्णालयात असलेले लालू प्रसाद यादव यांच्यावर आज (5 डिसेंबर) सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी त्यांची धाकटी मुलगी रोहिणी आचार्य आपली एक किडनी दान करणार आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हिमाचलमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत; सत्ता परिवर्तनाची परंपरा कायम राहण्याची चिन्ह!
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या ६८ जागांसाठी ४१२ उमेदवार रिंगणात होते आणि या निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ७५.६ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत मुख्यमंत्री जयराम ठाकुर, माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंहांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर, हिमाचल प्रदेशातील नागरिक भाजपाला पुन्हा संधी देतील, की विरोधी पक्ष काँग्रेससाठी सत्तेचा मार्ग मोकळा करतील, याची सर्वांना उत्सुकता आहे. ८ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल आहे. मात्र तत्पुर्वी विविध एक्झिट पोलनुसार निकाल समोर आले आहे.
‘भारत जोडो’ यात्रेत ‘मोदी-मोदी’च्या घोषणा; राहुल गांधींचं एकदम हटके प्रत्युत्तर
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान, ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आला आहे. राहुल गांधीनीही घोषणा देणाऱ्यांना हटके प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधींच्या उत्तराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या घटनेचा हा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.दरम्यान, राहुल गांधी यांनीही ‘फाईंल किस’ देत भाजपा समर्थकांना प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधीच्या कृतीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
राहुल द्रविडची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? बीसीसीआय करत आहे गांभीर्याने विचार
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला लवकरच नारळ दिला जाऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. खरंच त्याची उचलबांगडी होणार का या संदर्भात अधिकृत अशी माहिती आलेली नाही. इनसायडर स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार ही माहिती समोर येत आहे. खरं तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) च्या मुंबईतील मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बोर्ड भारताच्या टी २० सेटअपसाठी स्वतंत्र प्रशिक्षक नियुक्त करण्याचा ‘गांभीर्याने विचार’ करत आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय टी२० संघासाठी नवीन कोचिंग सेटअप जानेवारीमध्येच जाहीर केला जाऊ शकतो. याचा अर्थ भारत नवीन कर्णधार आणि नवीन प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. माध्यमातील चर्चांमध्ये हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताचा नवा टी२० कर्णधार म्हणून अधिकृतपणे नियुक्त केले जाईल अशा बातम्या समोर येत होत्या. आता बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला पुष्टी केली आहे की बोर्ड भारतीय टी२० संघासाठी नवीन प्रशिक्षक नियुक्त करण्यात देखील इच्छुक आहे. सर्व शक्यतांमध्ये, नवीन प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत जवळून काम करेल.
SD Social Media
9850 60 3590