महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI कडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. US फेडरच्या बैठकीआधी RBI पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाई कमी होण्याची चिन्हे आणि विकासाला चालना देण्याची गरज लक्षात घेता, रिझर्व्ह बँक बुधवारी होणाऱ्या पतधोरण आढाव्यात व्याजदरवाढीबाबत नरमाईची भूमिका घेण्याची शक्यता आहे.
सलग तीन वेळा व्याजदरात 0. 50 टक्के वाढ केल्यानंतर आता आरबीआय यावेळी व्याजदरात 0.25 ते 0.35 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 5 ते 7 डिसेंबर याबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत रेपो रेट वाढवण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. 7 सप्टेंबर रोजी रेपो रेट संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार यूएस फेडरल रिझर्व्ह देखील रेपो रेटच्या दरात वाढ करू शकते. त्यामुळे या महिन्यात दरवाढ होण्याची शक्यता आहे. EMI चा बोजा वाढू शकतो. तर लोन घेणाऱ्यांना आता जास्त व्याजदर भरावं लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने यंदा मे महिन्यापासून रेपो दरात 1.90 टक्के वाढ केली आहे. जानेवारीपासून महागाई 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या वर राहिली आहे.
बँक ऑफ बडोदाचे चीफ इकॉनॉमिस्ट मदन सबनवीस म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की एमपीसी यावेळीही दर वाढवेल. मात्र ही वाढ 0.25 ते 0.35 टक्के असेल. या आर्थिक वर्षात रेपो रेट ६.५ टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. म्हणजेच फेब्रुवारीमध्ये रेपो दरात पुन्हा वाढ होण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. पंत यांच्या म्हणण्यानुसार, महागाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात RBI 0.25 टक्क्यांनी रेपो रेट वाढवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता EMI देखील वाढणार आहेत.
महागाई येत्या काळात कमी होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र ती कधी कमी होणार याबाबत ठोस असं कोणीही सांगितलं नाही. फेडरल रिझर्व्हची अनुकूल भूमिका आणि चलनवाढीत काहीशी घट लक्षात घेता आरबीआय आणि एमपीसी हे दरही 0.25-0.35 टक्क्यांनी किंचित कमी करतील, असे कोटक महिंद्र बँकेचे पूर्णवेळ संचालक शांती एकंबरम यांनी सांगितले.