राज्यातील सरकार कधी कोसळणार?; सुषमा अंधारेंनी सांगितला महिना
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना देखील टोला लगावला. त्या भंडाऱ्यात बोलत होत्या. राज्यातील शिंदे,फडणीस सरकार जानेवारी महिन्यात कोसळणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भोंडेकर हे विदर्भातील माझे सर्वात लाडके भाऊ आहेत. त्यांना नक्कीच भेटणार असून, नरूभाऊ येणारी निवडणूक जिंकणार नाहीत. भंडारा येथून मी निवडणूक लढवण्यापेक्षा या जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारीच भोंडेकरांसाठी त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सक्षम असल्याचा घणाघात अंधारे यांनी केला आहे.
साताऱ्याच्या रँचाेंचा भन्नाट आविष्कार! तयार केली ऊसाच्या इंधनावर चालणारी गाडी
भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असल्यानं सामान्यांना घाम फुटला आहे. अशातच चक्क उसापासून इंधन तयार करून बाईकचे भन्नाट जुगाड तयार करण्याचा आविष्कार साताऱ्यातील विक्रांत पवार या तरुणानं केला आहे. विशेष म्हणजे ही गाडी अवघ्या 65 रुपयात 50 किलोमीटर अंतर धावू शकते. विक्रांतच्या या आविष्काराचे सर्वत्र कौतूक होत असून त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
साताऱ्यातील अरविंद गवळी कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विक्रांत पवारने वयाच्या 18 व्या वर्षीच सुमारे दीड वर्षाच्या अतोनात प्रयत्नातून उसापासून तयार होणाऱ्या हायड्रोजन इथेनॉलवर चालणारी गाडी बनवली आहे. गाडीसाठी लागणारे इंधन देखील विक्रांतनेच बनवले असल्याचे विक्रांतने सांगितले आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि त्याचा दिवसेंदिवस होत चाललेला कमी पुरवठा यावर पर्याय म्हणून विक्रांतची गाडी चोख काम बजावू शकते. भविष्यातील गरज लक्षात घेऊन विक्रांतने दीड वर्षांपूर्वीच्या मेहनतीनं भन्नाट गाडी बनवली आहे. ही गाडी उसापासून तयार हायड्रोजन इथेनॉल इंधनावर चालते. हे इंधन द्रव व वायू या दोन स्वरूपात आहे.
‘लोकसंख्या वाढवण्यासाठी हिंदूंनी मुलींचं लग्न 18 ते 20 वयात लावून दिलं पाहिजे’ आसामच्या खासदाराचं वक्तव्य
आसाममधील ऑल इंडिया युनायडेट डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) अध्यक्ष आणि खासदार बदरुद्दीन अजमल वादात सापडले आहेत. “हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांसारखी वेगानं वाढत नाही, ही त्यांची समस्या आहे. लोकसंख्या वाढीच्या मुस्लिम सूत्राची नक्कल करण्यासाठी हिंदूंनी त्यांच्या मुलींचं 18 ते 20 वर्षे वयातच लग्न लावून दिलं पाहिजे,” असं धक्कादायक वक्तव्य अजमल यांनी केलं आहे. तसंच, “हिंदू योग्य वयात लग्न करत नाहीत. दोन-तीन अफेअर करतात पण लग्न करत नाहीत. वयाच्या चाळीशीमध्ये ते लग्न करतात, तेही कौटुंबिक दबावाखाली. असं असेल तर त्यांची लोकसंख्या कशी वाढेल? असंही ते म्हणाले.
राहुल गांधींची भेट घेणं शिक्षकाला महागात पडलं; ‘या’ कारणामुळे आयुक्तांनी नोकरीवरुनच काढलं
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीपर्यंत ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली आहे. ही यात्रा सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे. राज्यातील विविध भागांतील लोक यात्रेत सहभागी होत आहेत आणि राहुल गांधींना भेटत आहेत. अशातच बडवानी जिल्ह्यात घडलेल्या एका प्रकाराने लक्ष वेधून घेतलंय. इथल्या कुजरी विद्यालयातील प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेश कनोजे सध्या चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे 24 नोव्हेंबर रोजी त्यांनी आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांसह भारत जोडो यात्रेत सहभाग घेऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर बोलल्यानंतर त्यांना धनुष्यबाण भेट दिला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बडवानीच्या सहायक आयुक्तांनी राजेश यांना निलंबित करण्याचे आदेश काढले.
आरोपी आफताबला तिहारमध्ये वाचायची आहेत पुस्तके; तुरुंग प्रशासनाकडे केली मागणी
श्रद्धा वालकर खूनप्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने तिहार तुरुंग प्रशासनाकडे एक मागणी केली आहे. ज्यावर तिहार प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे समोर आले आहे.
आफताबाने तुरुंगात वाचणासाठी कांदबरी आणि साहित्याची पुस्तके देण्यााची मागणी प्रशासनास केली आहे. यावर तुरुंग प्रशासनाकडून लवकरच त्याला पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अशी माहिती तिहार तुरुंगातील सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी मोबाईलवर बंदी; मद्रास उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश!
अनेक मंदिरांमध्ये ‘मोबाईल बंद ठेवा’, ‘शांतता पाळा’, ‘फोटो काढण्यास मनाई’ अशा सूचना लिहिलेल्या पाहायला मिळतात. मंदिर प्रशासनाकडून या सूचना दिल्या जातात. पण आता थेट मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरई खंडपीठानं मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तिरुचेंदुरच्या सुब्रह्मण्यमस्वामी मंदिर प्रशासनाकडून यासंदर्भात याचिका सादर करण्यात आली होती. यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने संपूर्ण तामिळनाडूमधल्या मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी लागू करण्याचे निर्देश तामिळनाडू सरकारला दिले. यावेळी मंदिरात शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी हे निर्देश दिल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.
तृणमूल काँग्रेसच्या बुथ अध्यक्षाच्या घरात बॉम्बस्फोट; तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू
पश्चिम बंगालच्या पुरबा मेदिनीपूर भागात तृणमूल काँग्रेसच्या बुथ अध्यक्षाच्या घरात बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे. पुरबा मेदिनीपुर येथील भूपतीनगर ठाण्याच्या हद्दतील अर्जुन नगर भागात तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी शुक्रवार (२ डिसेंबर) रोजी रात्री स्फोट झाला. या घटनेत टीएमसीच्या तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय या बॉम्बस्फोटात अन्य काहीजण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोट एवढा भीषण होता की त्यामध्ये बूथ अध्यक्षाचं संपूर्ण घर उध्वस्त झालं. ही घटना टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कोंटाई येथे होणाऱ्या सभेपूर्वी घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
भारतीय संघ बांगलादेश विरुध्द सज्ज
भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. या दरम्यान रोहित शर्माने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
गुरुवारी बांगलादेशमध्ये पोहोचलेल्या भारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी पहिले सराव सत्र घेतले. रविवारी वनडे सामन्यापूर्वी टीम इंडिया आज अखेरचा सराव करणार आहे.
SD Social Media
9850 60 3590