सतत बदलणारे हवामान आणि तापमानात होणारी तीव्र घसरण यामुळे लोकांना सर्दी आणि खोकला मोठ्या प्रमाणात होत असतो. या समस्या टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आवश्यक खबरदारी घेणे. परंतु जर तुम्हाला आधीच नाक वाहणे आणि सतत खोकल्याचा त्रास होत असेल, तर त्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंबदेखील केला जाऊ शकतो.
घरगुती उपाय तसे अनेक असतात. मात्र सर्दीवर सर्वात रामबाण उपाय, जो कोरोनाच्या काळातही आपण सर्वांनी केला तो म्हणजे वाफ घेणे. लवकर आणि आणि अधिक प्रभावी परिणामासाठी स्टीम घेणे उत्तम आहे. मात्र या स्टीममध्ये जर तुम्ही काही पदार्थ टाकले तर ही वाफ तुम्हाला सर्दीपासून खूप कमी वेळेत मुक्त करू शकते.
उपाय करा-1
वाफेसाठी पाणी घ्या आणि 1 टीस्पून वेलची, 10 ते 15 पाने तुळशीची पानं, 2 तुकडे कच्च्या हळदीचे, 4 ते 5 पुदिन्याची पाने उकळत्या पाण्यात घाला. भांडे झाकणाने 5 मिनिटे झाकून ठेवा. नंतर याची वाफ घ्या.
उपाय करा-2
वाफेच्या पाण्यात एक ते दोन चमचे ओवा टाका. ओवा अँटी-ऑक्सिडंट समृद्ध आहे आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे ओव्याच्या वाफेने सर्दीवर लवकर आराम मिळतो.
उपाय करा-3
सर्दी घालवण्यासाठी तुळशीची पानं रामबाण उपाय आहेत. यासाठी एका भांड्यात पाणी आणि तुळशीची पाने उकळा आणि नंतर गॅस बंद करून त्या पाण्याने वाफ घ्या.
उपाय करा-4
तुम्हाला मलावकारात लवकर सर्दीपासून आराम हवा असेल तर एका भांड्यात पाणी ओवा, अर्धा चमचा हळद आणि काही तुळशीची पाने टाकून पाणी उकळू द्या. त्यानंतर टॉवेलने चेहरा झाकून वाफ घ्या.
उपाय करा-5
सर्दीसाठी आणखी एक उपाय तुम्हाला मदत करू शकतो. यासाठी पाणी घेऊन त्यात थोडं आलं किसून टाका. तसेच त्यात एक चमचा ओवा टाका. या पाण्याचा वास खूप तीव्र असतो आणि यामुळे सर्दी तसेच सायनस आणि हलक्या डोकेदुखीपासून खूप आराम मिळतो.