जळगाव ः सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या उत्तर महाराष्ट्र विभाग आयोजित क्लटर मीट मध्ये ११० उद्योजक-व्यवसायिकांनी सहभाग घेतला. जळगाव, धुळे-1, धुळे-2, अकोला अशा चार चॅप्टरने या मीटचे आयोजन केले होते.
सॅटर्डे क्लबचे चेअरमन व मॅनेजिंग ट्रस्टी अशोक दुगाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या एक दिवसीय क्लटर मीटच्या मिक्सर नेटवर्कींग सत्रामध्ये झालेल्या पाच राऊंडमध्ये 586 व्यावसायिक संदर्भाची देवाण-घेवाण झाली, तर 29 व्यक्तींनी सोबत व्यावसायिक वाटचालीची प्राथमिक चर्चा केली.
सेल हेड प्रेझेंटेशन सत्रात सचिन दुनाखे (आयटी), राजेश चौधरी (वॅबसाईड), डाॅ. भावना चौधरी (वूमन विंग), निलेश झोपे (नॅशनल बिझीनेस), सी.ए.पवन अग्रवाल (इंटरनॅशनल बिझीनेस), अक्षय मुंडके (यंग इंटरप्रिनीअर), रश्मी गोखले (मॅगेझीन), अभिजीत वाठ (एक्सपान्शन) आदिंनी संबंधीत विषयांवर सादरीकरण केले. जेष्ठ व्यावसायिक अनिल कांकरिया यांनी अनुभव कथन करीत उपस्थितांशी संवाद साधला.
समारोप सत्रात चेअरमन अशोक दुगाडे यांनी भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थिती असून येत्या दोन वर्षात ती आणखी बळकट होईल असा विश्वास व्यक्त करुन गुंतवणूक डोक्यात हवी, बॅलन्सशीटमुळे आपण कुठे आहोत हे कळते, सॅटर्डे क्लबच्या सदस्यांनी प्रत्येक बैठक, कार्यक्रमास उपस्थिती देऊन सक्रीयता वाढावी, त्यामुळे त्यांचे नेटवर्कींग होऊन व्यवसाय वृद्धी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी दीपप्रज्वलन व रिजनल डिरेक्टरीचे प्रकाशन करण्यात आले. कुलदेवता स्मरण व प्रतिज्ञा खजिनदार उमेश पाटील यांनी सादर केली. प्रास्ताविक रिजन हेड श्रीहर्ष खाडीलकर यांनी तर सूत्रसंचालन दिनेश थोरात व दिव्या पाटील यांनी केले. आभार प्राेजेक्ट हेड जयेश पाटील यांनी मानले. राष्ट्रगीताने सांगता झाली.