डिप्रेशनमध्ये गेलेली माणसं सतत रागावतात; अशी लक्षणं असल्यास नक्की उपचाराची गरज

स्वतःशी बोलणे, उदास असणे, जास्त अन्न खाणे किंवा खाण्याची इच्छा नसणे ही नैराश्याची लक्षणे असू शकतात. मेडिकल न्यूज टुडे च्या माहितीनुसार, सध्या डिप्रेशन ही एक सर्वसामान्य समस्या बनत चालली आहे. घर आणि ऑफिस-व्यवसायाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या प्रक्रियेत बहुतांश व्यक्ती नैराश्याची शिकार होत आहेत. उदासीनतेमुळे स्त्रिया दु: खी आणि अपराधी वाटण्याची शक्यता असते, तर पुरुष चिडचिडे आणि रागीट होण्याची शक्यता असते. नैराश्यामुळे वागण्यात अनेक बदल जाणवू शकतात, जे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

नाराज आणि एकटेपणा –

गर्दीतही एकटेपणा आणि दुःखी वाटणारी व्यक्ती नैराश्याची शिकार असू शकते. नैराश्यामुळे व्यक्ती समाजापासून दुरावलेली राहते. सतत विचारात गढून जाणे ही त्याची सवय बनते.

विनाकारण राग येणे –

जास्त राग हे नैराश्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण असू शकते. नैराश्यामुळे माणसाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येऊ शकतो. अनेक वेळा, विनाकारण एखादी व्यक्ती रागावते आणि ओरडायला लागते.

झोपेचा त्रास –

मेंदूच्या विकासासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. चांगली झोप न मिळाल्याने मेंदू सतत काम करत राहतो, ज्यामुळे भविष्यात नैराश्य येऊ शकते. ज्या लोकांना झोपेचा त्रास होतो ते पुढे डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात.

भूक न लागणे किंवा जास्त खाणे –

नैराश्यामुळे अनेकांची भूक कमी होते. समोर आवडते पदार्थ असूनही लोक ते खाण्यास नकार देऊ लागतात. त्याच वेळी काही लोक नैराश्यामुळे जास्त खाणे सुरू करतात, ज्याला भावनिक खाणे (इमोशनल इटिंग) म्हणतात. अशा स्थितीत राग येताना भूक वाढू लागते.

स्वत:ला इजा पोचवणं –

नैराश्य ही एक मानसिक स्थिती आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे विचार मनात येऊ शकतात. काही लोक इतरांना इजा करण्याचा विचार करू शकतात, तर काही लोक स्वतःला दुखापत करून घेऊ शकतात. आजच्या काळात नैराश्य येणं (डिप्रेशनमध्ये जाणं) ही एक सामान्य समस्या आहे, परंतु त्याची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. Sdnewsonline त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.