दिवाळीच्या दिवशी अमरावतीत रेल्वेला मोठा अपघात, मालगाडीचे 15 ते 20 डबे घसरले, वाहतूक ठप्प

ऐन दिवाळीच्या दिवशी अमरावतीमध्ये रेल्वे अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्री उशिरा टीमटाला ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली आहे. जवळपास 15-20 डब्बे रुळावरून घसरले आहे. सुदैवाने या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा टीमटाला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर मालगाडीचे १५-२० डबे घसरले. कोळसा घेऊन जाणारी ही मालगाडी इंजनसह रुळावरून घसरली. रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे मोठा आवाज झाला.एकापाठोपाठ रेल्वेचे 15 ते 20 डबे रुळावरून खाली घसरले. मालगाडीचे इंजिन हे रुळाच्या बाजूला कोसळले. तर काही डबे हे रुळावर आडवे झाले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्या नरखेड मार्गे वळवण्यात आल्या आहे. रेल्वेच्या नागपूर डिव्हिजनमध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी पोहोचले असून युद्धपातळीवर रेल्वे रुळावर आणण्याचे काम सुरू आहे.

या अपघातामुळे आज नागपूर मुंबई रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

अजणी-अमरावती

भुसावळ-वर्धा

नागपूर-मुंबई

नागपूर-वर्धा

नागपूर-पुणे

गोंदिया-मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.