शर्मन जोशीने आपल्या करियर ची सुरुवात थिएटर पासून केली. त्या वेळी तो वर्षभरात ५५० प्रयोग करत असे. हिंदी सिनेमात त्यांचा पहिला चित्रपट गॉडमदर होता. ३ इडियट्स मुळे शर्मन जोशी यांना बॉलीवूड मध्ये ओळख मिळाली. शर्मन जोशीने रंग दे बसंती, स्टाईल, मेट्रो, थ्री इडियटस, ढोल, गोलमाल, फेरारी की सवारी अशा अनेक चित्रपटात त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. शर्मनचे वडील अरविंद जोशी, काका प्रवीण जोशी हे रंगकर्मी होते. अरविंद जोशी यांनी अनेक हिट गुजराती चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, परंतु गुजराती नाटकांचे दिग्गज अभिनेता आणि गुजराती नाटकांचे दिग्दर्शक म्हणून त्यांची खरी ओळख होती. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर अरविंद जोशी यांनी ‘इत्तेफाक’, ‘शोले’, अपमान की आग, ‘खरेदीदार’, ‘कहानी’ ‘नाम’ यासारख्या चित्रपटांत सहाय्यक कलाकार म्हणून छोट्या भूमिका केल्या. अनेक हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.
त्यामुळे शर्मनला रंगभूमीवर मनापासून प्रेम आहे व शर्मनला मराठी भाषेविषयी खूप प्रेम आहे.त्या मुळेशर्मन जोशीने एका मराठी नाटकाची निर्मिती केली आहे. सुप्रसिद्ध नाट्यलेखक-दिग्दर्शक केदार शिंदे याने हे नाटक आणले असून, त्याची निर्मिती शर्मनने केली आहे. ‘वाजले की बारा’ असं या नाटकाचं नाव आहे. ‘द प्ले दॅट गोज राँग’ या लंडन-अमेरिकेत गाजलेल्या नाटकाचा हा अधिकृत रिमेक असल्याचं शर्मननं केदार-शर्मन या जोडीनं भारतामध्ये गुजराती आणि इंग्रजी भाषेत हे नाटक सादर करण्याची यशस्वी कामगिरी करून दाखवली आहे. शर्मनची ही पहिलीच मराठी नाट्यनिर्मिती आहे.
शर्मन जोशीचे लग्न बॉलीवुड अभिनेता प्रेम चोपडा यांची मुलगी प्रेरणा चोपडा यांच्या बरोबर झाले आहे. शर्मन आणि प्रेरणाला एक मुलगी आणि दोन जुळी मुलंदेखील आहेत. त्यांची नावे विहान जोशी आणि वर्हांन जोशी. शर्मन बहीण मानसी ही देखील एक अभिनेत्रीच आहे तिने लोकप्रिय टीव्ही आणि सिनेअभिनेता रोहित रॉयशी लग्न केलं आहे.
संजीव वेलणकर ,पुणे