नुकत्याच घोषित झालेल्या MHT-CET परीक्षेच्या निकालात जळगाव मधील वेव्हज क्लासेस च्या विद्यार्थ्यानी अभूतपूर्व यश मिळवले.
क्लास चा प्रथमेष संजय सोनवणे हा विद्यार्थी ओबीसी प्रवर्गातून जेईई च्या स्कोर वर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ़ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे या भारत सरकार च्या नामांकित कॉलेज ला कॉम्प्युटर सायन्स ला प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाला. तर MHT – CET परीक्षेत मुक्ताई कुलकर्णी (99.88), गणेश वनम्हने (99.20), पाटील ओम विनोद (97.30), यश पीतांबर पाटील (95.9), ऐश्वर्या पाटील (95.3), यश सचिन कुळकर्णी, (95), गौरी कुलकर्णी (94), यश सावदेकर (93.17), ऋषी केश भरत पाटील (93), वैभव चौधरी (92.81), झाएद खान (91.87), सृष्टी सोनवणे(91.17), अन्विष्का कुळकर्णी (90.67), संकल्प माळी (90) यांना 90 परसेन्टाईल च्या वर स्कोर मिळाला. तर ईतर 22 विद्यार्थी 80 परसेन्टाईल च्या वर स्कोर मिळवून गव्हर्न्मेंट कॉलेज ला प्रवेशासाठी प्रयत्न करतील.
या वर्षी च यश हे विशेष आहे. कारण हे विद्यार्थी कोरोना ची विशेष झळ बसलेले होते. जिद्दीने अभ्यास करून , आणि प्रामाणिक प्रयत्न करून विद्यार्थ्यानी हे यश मिळविल्याचे क्लास चे संचालक प्रा अभय कुळकर्णी यांनी सांगितले. क्लास मध्ये NEET/MHT CET, तसेच 12 बोर्ड, टेस्ट सीरीज साठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यानी वेव्हज क्लासेस, यूनियन बँक बिल्डिंग रिंग रोड जळगाव येथे संपर्क करावा.