फडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. शिदे-फडणवीस सरकारमधील विविध नेत्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. माझ्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं, तर माझ्या नाकीनऊ आलं होतं, ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत? असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे. ते बारामतीत बारामती सहकारी बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
पुण्याचं वातावरण तापलं! मनसे-युवासेना-भाजपचं आंदोलन, पाकिस्तानचा झेंडा जाळला
पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. आज पुण्यात त्याविरोधात युवासेना आणि मनसेनं आक्रमक आंदोलन करून पाकिस्तानचा झेंडा जाळला तर भाजपसह 12 हिंदुत्ववादी संघटनांनी थेट पोलीस आयुक्तालयातच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन देशद्रोहाचा गुन्हा करण्यासाठी निवेदनही दिलंय.
शुक्रवारी पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची एक घोषणा दिल्याचा आरोप होत आहे. यानंतर आज पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाबाजीने पुण्यातं वातावरण चांगलंच तापलं. याविरोधात युवासेना, मनसेसह भाजपही मैदानात उतरलं आहे.
गोवंश हत्या बंदीमुळे वाढला लम्पीचा धोका? पाहा काय म्हणाले अजित पवार
महाराष्ट्रासह देशभरात लम्पी व्हायरसने थैमान घातलं आहे. गाय आणि बैल यांना लम्पी व्हायरस होत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गोवंश हत्या बंदीमुळे तर लम्पी व्हायरसचा धोका वाढला नाही ना? अशी शंका व्यक्त केली. ‘आज माझाही दुधाचा व्यवसाय आहे. लम्पी का वाढत गेला? मध्यंतरी गोवंश हत्या बंदीचा कायदा आला. आपल्याकडे 50 टक्के गाई आणि 50 टक्के बैल व्हायचे, पण मधल्या काळात बैलांची संख्या वाढली, त्यामुळे लम्पीचा प्रार्दुभाव वाढला आहे, असं म्हटलं जातं. खरं खोटं आपल्याला माहिती नाही,’ असं अजित पवार म्हणाले. कृषी उत्पन्न बाजार समितीची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बारामतीत होत आहे, या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
यंदा परतीचा पाऊस लाबंणीवर, नवरात्र जाणार पावसात, हवामान विभागाकडून अंदाज
जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात केलेल्या पावसाने परतीच्या पावसाची चाहूल काही भागात दिली आहे. राज्याच्या काही भागांत 30 सप्टेंबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळेही राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजात हे नमूद करण्यात आले आहे.
विदर्भ आणि कोकण-गोवा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर कमी होईल. उत्तर-मध्य कोकणात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा काहीसा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भ आणि दक्षिण कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, तर पुण्यासह उर्वरित राज्यात त्या कालावधीत सामान्य पाऊस पडू शकतो.
हिटर वापरताय? एक चूक जीवावर बेतली, बीडमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू
बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिटरमधील उकळते पाणी झोपलेल्या महिलेच्या अंगावर पडल्याने, गंभीर भाजलेल्या 31 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बीडच्या पिंपळगाव येथे आज पहाटेच्या सुमारास घडली. उषा रंजीत सुरवसे (वय 31) रा. पिंपळगाव ता. माजलगाव असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उषा सुरवसे ह्या रात्री 10 च्या सुमारास झोपताना हिटर सुरू करून झोपल्या होत्या. दरम्यान रात्रभर हिटर सुरु असल्याने तो गरम होऊन प्लॅस्टीकच्या टाकीतील पाणी उकळत होते. दरम्यान त्या टाकीची क्षमता संपल्याने ती टाकी फुटली. यावेळी उषा ह्या त्या टाकीला लागून झोपल्या असल्याने त्यांच्या अंगावर पाणी पडले.
आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तारांचा मोठा दावा!
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी येथील जाहीर सभेत बोलताना मोठा राजकीय दावा केला आहे. आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत. असं सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तारांच्या या जाहीर विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल(शनिवार) ते परभणीत होते. यावेळी त्यांचा वाहन ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला असता, सत्तार यांनी गाडीतून उतरून त्या शिवसैनिकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांचं निवेदनही स्वीकारलं.
सचिन पायलट होणार नवे मुख्यमंत्री?, राजस्थानमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांनी काँग्रेस अध्यपदासाठी निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर राजस्थानमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज ( २५ सप्टेंबर ) राजस्थान काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत नवा मुख्यमंत्री कोण होणार, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.काँग्रेसचे महासचिव आणि राजस्थानचे प्रभारी अजय माकन, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांची बैठक होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी अशोक गेहलोत यांनी म्हटलं की, “काँग्रेस अध्यपदासाठी ने निवडणूक लढणार आहेत. अध्यक्ष झाल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार? याचा निर्णय पक्ष घेईल.” मात्र, गेहलोत यांच्यानंतर काँग्रेसचे नेते सचिन पायलट की अन्य कोण? मुख्यमंत्रीपदी होणार हे पाहावे लागणार आहे.
तिरूपती बालाजीची संपत्ती जाहीर, मालमत्ता, ठेवी, सोनं किती?; आकडेवारी पाहून थक्क व्हाल
तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. देश विदेशातूनं तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते. या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे.तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी यांनी सांगितलं की, “देशात देवस्थानाच्या ९६० मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत ८५,७०५ कोटी रुपये आहे. १९७४ ते २०१४ सालादरम्यान वेगवेगळ्या सरकारच्या अंतर्गत मंदिर समितीने ११३ मालमत्ता निकाली काढल्या आहेत. मात्र, २०१४ नंतर एकाही मालमत्तेची विक्री केली नाही.”
दरम्यान, तिरूपती बालाजी देवस्थानाची विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये १४ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहेत. तर, १४ टन सोन्याचा साठाही देवस्थानाकडे आहे. त्यामुळे तिरूपती बालाजी देवस्थान जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
चंदिगडच्या विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचं नाव, ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’च्या ९३ व्या भागात देशवासीयांना संबोधित केले. यावेळी मोदी यांनी योग, खेळ, शिक्षण, भारतातील विविधता, पर्यटन, पर्यावरण अशा विषयांवर भाष्य केले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचाही उल्लेख केला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी देशातील एक महत्त्वाच्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा केली.देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये २८ सप्टेंबर हा विशेष दिवस आहे. या दिवशी आपण थोर देशभक्त शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करू. भगतसिंग यांच्या जयंतीच्या अगोदर भारत सरकारने त्यांना श्रद्धांजली म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चंदीगड विमानतळाचे नाव बदलून या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
आपल्या देशात सध्या उत्सवांचे पर्व आहे. उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या नऊ दिवसांत आपण उपवास करतो तसेच काही नियम पाळतो. नवरात्रीनंतर विजयादशमी साजरी केली जाईल. या सणांमध्ये भक्तीभाव आध्यात्मिकतेसोबतच अनेक संदेश असतात, असेही मोदी म्हणाले.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना पदच्युत केलं?, सोशल मीडियावरील अफवांवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मौन
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना पदच्युत केल्याच्या अफवा इंटरनेटवर मुख्यत: सोशल मीडियावर पसरल्या आहेत. क्षी जिनपिंग समरकंदमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी (SCO) गेले असताना त्यांना कट रचून पदावरून हटवण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियामध्ये पसरले आहे.या घटनेबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी अद्याप पुष्टी केलेली नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या वृत्ताबाबत मौन बाळगले आहे. याबाबत चीनमधील माध्यमांनीही कुठलेही वृत्त प्रसारित केले नाही.
अजिंक्य रहाणेच्या संघाने रचला इतिहास, १९व्यांदा कोरले दुलीप करंडकावर नाव
भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाने दुलीप करंडक स्पर्धा जिंकली आहे. त्यांनी अंतिम फेरीत दक्षिण विभागाचा २९४ धावांनी पराभव केला. पश्चिम विभागाने पहिल्या डावात २७० धावा केल्या होत्या. यानंतर दक्षिणेने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. पश्चिमने दुसऱ्या डावात ४ बाद ५८५ अशी डोंगरी धावसंख्या उभारली. दक्षिण संघाला सामना जिंकण्यासाठी ५२९ धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु दुसऱ्या डावात त्यांना केवळ २३४ धावाच करता आल्या. १९ व्यांदा दुलीप करंडक जिंकण्यात पश्चिम विभागाचा संघ यशस्वी ठरला.
भारतीय संघ आज हैदराबादमध्ये कांगारूंना देणार धोबीपछाड
हैदराबादमध्ये अखेरच्या टी२० सामन्यात भारतीय संघ विजयाच्या निश्चयाने उतरणार असून मालिका २-१ अशी जिंकण्याचा रोहित ब्रिगेडचा प्रयत्न असेल. मोहालीत पराभूत झाल्यानंतर नागपूरमधील दुसऱ्या टी२० लढतीत ६ गडी राखून विजय साकारल्यानंतर आता टीम इंडिया विश्वकरंडकाआधी मालिका विजयाला गवसणी घालून आत्मविश्वास मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. अर्थात भारतीय संघाला यानंतर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करावयाचे आहेत; पण त्याआधी हर्षल पटेल व युझवेंद्र चहलचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय असणार आहे.
SD Social Media
9850 60 3590