धक्कादायक! मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना ड्रग विकल्याचा प्रकार, बोरीवलीत महिलेला अटक

शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच प्रकरणी मुंबईतील बोरिवली एमएचबी पोलिसांकडून गुरुवारी दुपारी एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेकडून 250 ग्राम वजनाच्या गांजा हस्तगत करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत 2000 रुपये इतकी आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

गुरुवारी दहिसर भागातील एका उद्यानात शालेय गणवेशात काही मुले धूम्रपान करत असल्याचे शिवसैनिकास आढळून आले होती. यानंतर ही बाब त्याने शाखाप्रमुख भूपेंद्र कवळी यांना फोनद्वारे कळवली. यानंतर शाखाप्रमुखाने सदर ठिकाणी जाऊन त्या मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापैकी तीन मुले पळून जाण्यात यशस्वी झाली. मुले पळाल्यामुळे काहीतरी गैरप्रकार होत असल्याचं ध्यानात येताच कवळी यांनी त्या मुलाला नाव आणि शाळेचे नाव विचारून माहिती घेतली आणि ही बाब पोलिसांना कळवली.

यानंतर एमएचबी पोलिसांनी गणपत पाटील नगर गल्ली नंबर 1 मधून एका ड्रग विकणारी 52 वर्षीय मुस्लिम महिलेला काल दुपारी अटक केली आहे. अटक करण्यात आलेली आरोपी महिला गेल्या काही वर्षांपासून शाळेच्या आणि कॉलेजच्या मुलांना ड्रग विक्री करण्याचं काम करत होती.

पालकांमध्ये भितीचे वातावरण –

दरम्यान ड्रग विकणारी महिलेला अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकारानंतर बोरिवली आणि दहिसर पश्चिमच्या परिसरामध्ये शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या महिलेची एमएचबी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

शिवसेनेची मागणी –

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे बोरिवली आणि दहिसर पश्चिम परिसरामध्ये मोठ्या संख्येत ड्रग पॅडलर आहेत, हे ड्रग पेडलर शाळांच्या मुलांना ड्रगचा विळख्यामध्ये घालत आहेत. त्यामुळे अशा सर्व ड्रग पॅडलरवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख भुपेंद्र कळवी यांनी पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.