माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं निधन
तब्बल आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आलेले लोकप्रिय नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचं निधन झालं आहे. उद्या नवापूर इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णाल्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
आम्हाला गद्दार म्हटले आहे, ते आम्हाला मान्य आहे पण… गुलाबराव पाटलांची कबुली
शिवसेनेतील 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मागच्या दोन महिन्यांपासून बंडखोर आमदार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये खटके उडताना दिसत आहे. दरम्यान एकेकाळी शिवसेनेचे कट्टर असलेले गुलाबराव पाटील यांच्यावर काल (दि.17) विरोधी पक्षनेते अजीत पवारांनी चांगलीच टीकेची झोड उठवली. दरम्यान यावर गुलाबराव पाटील यांनीही पलटवार केला आहे. जळगावमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे.यावर गुलाबराव पाटील म्हणाले कि, अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. टीका करणं त्यांचं काम आहे. पण अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले हे पण त्यांनी मान्य करायला पाहिजे. मात्र त्यांनी आम्हाला गद्दार म्हटले आहे, ते आम्हाला मान्य आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले. पण अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहे, सरकारच्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्यांची होती.
मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांवर आभाळातून ‘मृत्यू’ कोसळला; भंडाऱ्यातील हृदयद्रावक घटना
राज्याच्या अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचंही समोर आलं आहे. कुठे पुराच्या पाण्यात माणसे वाहिल्याच्या तर कुठे भिंत कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. भंडारा जिल्ह्यातूनही एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.यात मासेमारीसाठी गेलेल्या दोघांवर वीज कोसळली. या घटनेत वीज कोसळल्यानंतर नाल्यात पडून दोघांचाही मृत्यू झाला. जिल्ह्याच्या गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरापूर (हमेशा) येथील धरणावर ही घटना घडली आहे. दिनेश खुणे (वय 48), रा. पुलपुट्टा मध्य प्रदेश आणि बुधराम हांडके, रा. हिरापूर, तुमसर अशी मृतांची नावं आहेत.
फक्त 3 तासांची झोप तरी सत्तरीत पंतप्रधान मोदी फिट
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. नरेंद्र मोदी हे केवळ महान आणि दिग्गज राजकारणी नाहीत तर ते त्यांच्या फिटनेससाठी देशात आणि जगात ओळखले जातात. तो केवळ राजकारणातच नाही तर तंदुरुस्तीच्या बाबतीतही जागतिक आयकॉन बनला आहे. देशातील तरुणांना आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल जागरुक करण्यासाठी त्यांनी ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ मोहीमही सुरू केली आहे. एवढ्या व्यस्त दिनचर्येत पंतप्रधान मोदी स्वतःला इतके तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतात.
पुन्हा 100 कोटींचा आरोप, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर मोठा बॉम्ब
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री होते. त्याच गोष्टीचा धागा पकडत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. “आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे शंभर कोटी रुपये घेतले”, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे चौकशीसाठी पत्रदेखील दिल्याचे रामदास कदम यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा काल रत्निगिरीत दाखल झाली होती. त्यांच्या दौऱ्यानंतर लगेच आज दुसऱ्या दिवशी रामदास कदम यांनी गंभीर आरोप केला आहे.
मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार, विक्रमी पाऊस पडण्याची शक्यता
मागच्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या पावसाने दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात उघडीप दिली. मुंबईसह उपनगरात पावसाने मागच्या 24 तासांत जोरदार हजेरी लावली. याचबरोबर पुण्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून खडकवासलासह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईसह उपनगरातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. तसेच सातारा जिल्ह्यातील कोयनेतूनही पाण्याच विसर्ग वाढवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला ,जळगाव ,धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आजही राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
प्रतीक्षा संपली! 8 चित्ते ग्वाल्हेरमध्ये दाखल, विमानतळावरची पहिली झलक
भारतीयांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. १९५२ रोजी विलुप्त झालेल्या चित्त्याला पुन्हा एकदा भारतात आणलं जात आहे. विशेष विमानाने नांबियामधून ८ चित्ते भारतात दाखल झाले आहेत. मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्क इथे या चित्त्यांना ठेवलं जाणार आहे.
चित्ते लष्कराच्या विशेष हेलिकॉप्टर चिनूकमधून उड्डाण करतील आणि त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलं जाणार आहे. जिथे ते काही दिवस खास बंदोबस्तात राहणार आहेत. साधारण एक महिना त्यांच्यावर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून असेल.
PM मोदींच्या वाढदिवशी देशाला मिळणार राष्ट्रीय लॉजिस्टिक्स पॉलिसीची भेट
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी देशाला मिळणार राष्ट्रीय लॉजिस्टिक्स पॉलिसीची भेट, ठरेल खरी गेमचेंजर…! देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर 22) 72 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने नामिबियातून चित्ते भारतात आणले जात आहेत हे तुम्हाला माहीत असेलच पण तितकीच गेमचेंजर बातमी आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे.
ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी एका कार्यक्रमात राष्ट्रीय लॉजिस्टिक्स पॉलिसी जाहीर करणार आहेत. जीडीपीतील लॉजिस्टिक्सचं प्रमाण 8 टक्क्यांनी कमी करणारं हे धोरण देशासाठी गेमचेंजरच ठरणार आहे.
सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने न्यूज 18 ला दिलेल्या माहितीनुसार, देशाला लॉजिस्टिक्स हब बनवून आर्थिक घडामोडींना वेग देऊन 2030 पर्यंत जागतिक स्तरावरील उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या दृष्टिने तयार केलेलं हे धोरण लॉजिस्टिक्स विषयातील गेमचेंजर ठरू शकेल.
जागतिक कुस्ती स्पर्धा : रविकुमारचे आव्हान संपुष्टात
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत मात्र भारतीयांची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या रविकुमार दहियाचे आव्हान सुरुवातीलाच संपुष्टात आले. फ्री-स्टाइल प्रकारात आता नवीन मलिकला (७० किलो) कांस्यपदकाची संधी आहे.
भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका : फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय संघ पराभूत ; इंग्लंड महिला संघाविरुद्धची मालिका १-२ अशी गमावली
फलंदाजांच्या अपयशानंतर भारतीय महिला संघाच्या गोलंदाजांनी इंग्लंडंवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. परंतु धडाकेबाज फलंदाज अॅलिस कॅप्सेने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडला सात गडी राखून विजय मिळवून दिला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका भारताने १-२ अशी गमावली.
SD Social Media
9850 60 3590