जळगाव जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने मानाचा असा जय गणराया पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. उत्कृष्ट आरास व आकर्षक गणेश मुर्ती उपरोक्त पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षीचा उत्कृष्ट आराससाठी जळगाव जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा मानाचे प्रथम पारितोषिक जय गणराया पुरस्कार 2022 हा बळीराम पेठेतील आझाद क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ देण्यात आला. सदर पुरस्कार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, सहा.पोलीस अधिक्षक (गृह) संदिप गावित, यांच्या शुभहस्ते तसेच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, किशोर भोसले, अमित भाटीया, मुंकुंद मेटकर, दीपक जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे प्रदान करण्यात आला.मंडळाचे पदाधिकारी अश्विन भोळे प्रतीक पाटील उपस्थित होते.