मंत्र्याविरोधात FIR दाखल
उद्योगमंत्री उदय सामंत यांना मारण्याची धमकी देणाऱ्या रिफायनरी विरोधी समितीचे सरचिटणीस नरेंद्र जोशी यांना झालेल्या मारहाणप्रकरणी रिफायनरी विरोधी संघटनेने आंदोलान पुकारलं होतं. या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि अन्य तीन संशयित व्यक्तींविरोधात FIR दाखल करून घेण्यात आली आहे. तब्बल बारा तास आंदोलन करणाऱ्यांसमोर पोलीस प्रशासनाला अखेर झुकावं लागलं.
नरेंद्र जोशी यांना न्यायालयाच्या आवारात मारहाण करण्यात आली होती. तसेच चिरा डोक्यात मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मारहाण करताना मारेकऱ्यांनी आम्ही उदय सामंत यांची माणसे आहोत असं सांगितलं असल्याचा आरोप नरेंद्र जोशी यांनी केला. त्यामुळे उदय सामंत यांनाही या प्रकरणात गोवण्यात आलं.
मारहाण झालेले नरेंद्र जोशी यांची पोलिसांकडून मेडिकल टेस्टही करण्यात आली होती. या मारहाणीचा निषेध म्हणून राजापूर पोलीस स्टेशनमध्ये ठीया आंदोलन करण्यात आलं होतं. ॲडिशनल एस पी जयश्री देसाई यांनी आंदोलकांना आश्वासन दिले की या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, मग ते उदय सामंत असो किंवा अन्य कोणी, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. हे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी रात्री बारा वाजता आपलं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.