आज दि.८ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची प्रकृती बिघडली; डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची तब्येत जास्तच बिघडल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. एलिझाबेथ यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. क्वीन एलिझाबेथ या एपिसोडिक मोबिलिटी त्रासाने  ग्रस्त आहे.

बकिंगम पॅलेसकडून जारी केलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी दिलेल्या सल्लानुसार महाराणी एलिथाबेथ त्यांच्या देखरेखीखाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.

आर्मीचं ओळखपत्र दाखवत महिलेची फसवणूक

गेल्या आठवड्यात घर भाड्याने देण्याबाबत ऑनलाईन जाहिरात दिल्यानंतर फसवणुकीचा प्रकार पुण्यातून समोर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता नागपुरातूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्मी ऑफिसर असल्याचे एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन, सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.आपला नागपुरातील फ्लॅट भाड्याने देण्यासाठी मुंबईमध्ये राहणाऱ्या एका महिलेने जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीवरून तिला एक फोन आला होता. यावेळी त्या फोन करणाऱ्याने आपण आर्मी ऑफिसर आहोत. तसेच जम्मू-काश्मिरमध्ये आपली पोस्टिंग आहे. मात्र, मला नागपुरात भाड्याने घर पाहिजे, असे सांगितले. तसेच त्याने आपली ओळख दाखविण्यासाठी आर्मीचे ओळखपत्र आणि कॅन्टीनचे कार्ड महिलेला पाठविले.

‘महिलांना कोणी नाकारु शकत नाही’, चित्रा वाघ मंत्री होणार?

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. याबाबत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं. महिलांना कोणी नाकारु शकत नाही. 50 टक्के महिला जनशक्ती आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला तुम्हाला मंत्री म्हणून दिसतील, असं सूचक विधान चित्रा वाघ यांनी केलं. तसेच “पक्षाचं हातात असतं कुणाला मंत्री करायचं, आम्ही कार्यकर्ते आहोत आणि काम करत राहू”, असंदेखील चित्रा वाघ म्हणाल्या.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत; रूळ जलमय, चाकमान्यांना ‘लोकलविलबां’चा फटका

मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याला आज दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने झोडपलं आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाहूर ते विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर परिणाम बघायला मिळाला आहे.

विशेष म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी पावसाने घोळ घातल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे, त्यामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसानं प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. दुपारपासून ऊन आणि अचानक संध्याकाळी आलेल्या पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत केली.

सायरस मिस्त्रींच्या अपघातात पोलिसांना वेगळाच संशय, अपघातावेळी आऊटर लेनला ट्रक?

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यावर मंगळवारी मुंबईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. पालघर जिल्ह्यात रविवारी दुपारी झालेल्या रस्ते अपघातात सायरस मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पंडोले यांचं निधन झालं होतं. पारशी धर्मीयांचं पवित्र स्थळ असलेल्या दक्षिण गुजरातच्या उदवाडाहून ते परतत होते. हा अपघात कसा झाला याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघात झाला तेव्हा सायरस मिस्त्रींच्या कारच्या आजूबाजूला आऊटर लेनमध्ये कोणता ट्रक होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, मशरूमसाठी जंगलात गेला अन् जीव गमावला

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात गेल्या आठ महिन्यात वाघांच्या हल्ल्यात अनेक लोकांचा बळी गेला आहे. यात आता आणखी एकाची भर पडली आहे. मशरूमसाठी जंगलात जाणे तरुणाच्या जीवावर बेतले आहे. वाघाने झडप घालून फरफटत नेत त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील उसेगावला लागूनच जंगल असल्याने अगदी 2 किमी अंतरावर घडली.प्रेमलाल प्रधान (वय-44) रा. उसेगाव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज गुरुवारी ही घटना घडली. देसाईगंजपासून 10 किमी अंतरावर उसेगाव आहे. या उसेगाव येथील प्रेमलाल प्रधान आणि वासुदेव झोडे (वय-32) हे दोघेही गुरुवारी सकाळी 7 वाजता गावाला लागूनच असलेल्या जंगलात अळंबी (मशरूम) गोळा करण्यासाठी गेले होते. दोघेही जवळपास राहूनच अळंबी शोधत होते. याचवेळी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने प्रेमलाल प्रधान याच्यावर झेप घेतली तसेच त्याला फरफटत नेत ठार केले.

भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस पक्षाची चिंता करावी, राधाकृष्ण विखे पाटलांचा राहुल गांधींना टोला

भारताला एकसंध करण्यासाठी आणि देशाला मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने 7  सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा असेल. या पदयात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. या भारत जोडो यात्रेवर भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली.

हाजी अली दर्गा परिसरात उभारला जाणार जगातील सर्वात मोठा ध्वजस्तंभ

हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येणार असून त्यावर भारताचा राष्ट्रध्वज लावण्यात येणार असल्याची माहिती हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी दिली आहे. या दर्ग्याचे नुतनीकरण सुरू असून ध्वजस्तंभ उभारणीचे कामही सुरू आहे. तसेच या राष्ट्रध्वजाच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करणार असल्याचंही ते म्हणाले.

२०२४ च्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी मैदानात, जाहीर केला निर्धार

देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे भाजपकडून यासाठी तयारी सुरू झाली आहे. त्यातच विरोधी पक्षदेखील लोकसभा निवडणुकीसाठी चांगलाच सक्रीय झाला आहे. यावरून आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘खेला होबे’ म्हणत भाजप हटावची घोषणा दिली आहे. भाजपच्या पराभवाची सुरुवात पश्चिम बंगालमधून होणार आहे, असा निर्धार ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

भारत-अफगाणिस्तान सामन्याआधी दुबई स्टेडियम परिसरात मोठी आग

यूएईमध्ये सध्या आशिया चषक स्पर्धा सुरू असून सुपर-४ सामने खेळवले जात आहेत. आज भारत-अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर सायंकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, हा सामना सुरू होण्याआधीच स्टेडियमच्या बाहेर मोठी आग लागली असून आगीचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.