महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अमित शाह पहिल्यांदाच मुंबईत, लालबागच्या राजाचं दर्शन घेणार
महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तांतरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच राज्यात येणार आहेत. मुंबईमध्ये आल्यानंतर अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम समोर आला आहे. 4 सप्टेंबरला रात्री अमित शाह मुंबईमध्ये येतील. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असेल. 5 तारखेला सकाळी 10 वाजता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जातील.
लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर 11 वाजता अमित शाह वांद्र्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचं दर्शन घेतील, त्यानंतर 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अमित शाह बैठक घेणार आहेत, तसंच फडणवीसांच्या गणपतीचंही ते दर्शन घेतील.
अमित शाह मुंबईत आल्यावर भेटायला जाणार का? मुख्यमंत्री क्षणभर थांबले मग म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला. अमित शाह गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत येणार आहेत. ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. अमित शाह मुंबईत आले तर त्यांच्या भेटीसाठी जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री क्षणभर थांबले. त्यांनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतनीने प्रतिक्रिया दिली ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांममध्ये हशा पिकला.
“आता ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि शिवसेना-भाजपची युती आहे. आपल्याला माहिती आहे सरकारच्या पाठीमागे… (मुख्यमंत्री हसले) आज शिवसेना भाजप युतीचं जे मजबूत सरकार स्थापन झालं आहे. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं योगदान आहे. त्यांनी आम्हाला सागितलं आहे, राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे पाठीशी आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बिग बी अमिताभ बच्चन कोरोना निगेटिव्ह; सुरू केलं KBC चं शुटींग
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना काही दिवसांआधी कोरोनाची लागण झाली. बिग बी केबीसी 14 चं शुटींग करत असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. बिग बींनी रात्री उशिरा ट्विट करत ही माहिती दिली होती. दरम्यान बिग बींच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. बिग बी अमिताभ बच्चन हे कोरोना मुक्त झाले आहेत. 9 दिवसांनंतर बिग बींची कोरोनाचा चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे. बिग बींनी त्यांच्या पर्सनल ब्लॉगवरुन ही माहिती त्यांच्या चाहत्यांनी दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर बिग बींनी केबीसीच्या मंचावर नव्यानं कमबॅक केलं आहे.
‘मातोश्रीवर किती खोके जातात माहिती आहे’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप
महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेना आमदारांवर सडकून टीका केली. एवढच नाही तर प्रत्येक आमदाराला 50 खोके मिळाल्याचा आरोपही ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही 50 खोके एकदम ओके, अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांवरून शिंदेंकडे गेलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. मातोश्रीवर किती खोके जातात, याची माहिती आहे, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे.
ट्वीटरनं युजर्ससाठी आणलं नवीन फीचर
ट्वीटर हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपल्याला बरीच माहिती मिळते. अगदी सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटी आणि पॉलिटीकल व्यक्तिमत्वापर्यंत सगळेच लोक येथे सक्रिय असतात. येथे फोटो, व्हिडीओ आणि टेक्स फॉरमॅटमध्ये आपल्याला माहिती मिळते. ज्यामुळे हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, हे म्हणायला काही हरकत नाही.ट्वीटर नेहमीच आपल्या युजर्ससाठी काहीना काही अपडेट घेऊन येत असतं, ज्यामुळे हे प्लॅटफॉर्म वापरणं सोपं होतं.आता देखील ट्विटरने नवीन फीचर आणल आहे. ज्यामध्ये एखाद्याने ट्वीट पाठवल्यानंतर देखील त्याला एडिट करता येणं शक्य आहे. यासाठी ट्वीटरने आता एक एडिट बटणाचा पर्याय सुरू केला आहे. जे सुरूवातीला देण्यात आला नव्हाता.
नगरमध्ये 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा, नदीजवळ राहणाऱ्यांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावली आहे. नाशिक, अहमदनगर, पुण्यासह राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील विसर्गही वाढवला आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आले आहे.भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात 1 ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून 36,731 क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे 4517 क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून 2240 क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 814 क्युसेस, निळवंडे धरण 1300 क्यूसेस व ओझर बंधारा 9833 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
महाभयंकर कॅन्सरवर पुण्याने दिला जबरदस्त फॉर्म्युला; सीरमने लाँच केली पहिली स्वदेशी लस
गर्भाशयमुखाच्या कर्करोगाशी असलेल्या लढ्यात भारताने एक ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे. सर्व्हायकल कॅन्सरवर उपचारासाठी सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची लस लाँच करण्यात आली आहे. डीसीजीआयने ही लस तयार करण्यासाठी सीरमला नियामक मान्यता दिली होती. ही लस उपलब्ध झाल्यामुळे आता देशातल्या कित्येक महिलांचा जीव वाचवणं शक्य होणार आहे.
दिल्लीत केजरीवालच! ५८ मतांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनादरम्यान अरविंद केजरीवाल सरकारने विश्वासदर्शक ठराव पास केला आहे. केजरीवाल यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ५८ मते पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर केजरीवालांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “दिल्लीमध्ये ऑपरेश लोटसला अपयश आलं”, असं म्हणत केजरीवालांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
आशिया चषकात आज श्रीलंका-बांगलादेश आमने-सामने; दोन्ही संघासाठी ‘करो या मरो’चा सामना
आशिया चषकात आज श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीअमवर हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. आज जो संघ जिंकेल, त्याच्यासाठी सुपर ४ चा मार्ग खुला होणार आहे. तर हारणारा संघ स्पर्धेबाहेर जाईल.
SD Social Media
9850 60 3590