वाजत गाजत गणपती आला, जगभरात मोठ्या थाटात गणरायाचे आगमन
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात आणि ढोल ताशाच्या गजरात आज घराघरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. आजपासून महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची सुरूवात होत आहे. गणरायाच्या आगमनासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. पूजेसाठी आणि सजावटीच्या विविध वस्तूंचेही दुकाने थाटण्यात आली आहेत. खरेदीसाठी गर्दी होत आहे.गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव घरातच साध्या वातावरणात साजरा करावा लागला. सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नाही नव्हती. मात्र, यंदा कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने गणेशोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता आहे. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडपही सजले आहेत.महाराष्ट्रासह देशात आणि परदेशात ही गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या धुमधडाक्यात होतांना दिसते.
सोनिया गांधींच्या आईचं निधन, इटलीमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोनिया गांधी यांच्या आई पाओला माईनो यांचं शनिवार 27 ऑगस्टला निधन झालं आहे. काल म्हणजेच 30 तारखेला पाओला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इटलीमधल्या त्यांच्या घरी पाओला माईनो यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
सोनिया गांधी यांच्या आई पाओला माईनो या मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी बरेच वेळा त्यांच्या उपचारासाठी इटलीलाही जात होते. मागच्याच आठवड्यात सोनिया गांधी या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत आईला भेटण्यासाठी इटलीला गेल्या होत्या.
‘जॉनी लिव्हर, संजय राऊत आणि गुरू’, शहाजीबापू-मिटकरींमध्ये वार-पलटवार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे. शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या टीकेवर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘अमोल मिटकरी हे पात्र राजकारणात नवं आहे. मिटकरीने संजय राऊतांना गुरू मानलं आहे, असं मला वाटतं. राऊतांचं जे झालं ते एक दिवस याचं होणार. शरद पवार यांनी चुकीची केलेली निवड म्हणजे अमोल मिटकरी’, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.शहाजीबापूंच्या या टीकेवर अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे. ‘शहाजीबापू पाटील शिंदे गटाचे जॉनी लिव्हर आहेत. महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस त्यांच्याकडे करमणूक म्हणून पाहतो. माझ्या भविष्याची चिंता त्यांनी करू नये. शिंदे गटाचा कसा कार्यक्रम वाजला आहे, याची चिंता करावी. स्वत:च्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं. हा महाराष्ट्राची करमणूक करणारा नवीन जॉनी लिव्हर आहे’, असं प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी दिलं.
एकच नंबर! मोबाइल फोन बूस्टरच्या मदतीनं आता कुठेही मिळेल स्टाँग सिग्नल
स्मार्टफोन ही काळाची गरज आहे. आता अगदी कॉलेजला जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. लवकरच भारतात 5G सेवा लाँच होणार आहेत. त्यानंतर भारतीयांना हायस्पीड इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे. आजच्या काळात आपण सर्वजण मोबाईल फोन वापरतो, परंतु दुर्दैवानं आजही आपल्या संपूर्ण देशात अनेक ठिकाणी मोबाईल सिग्नलची समस्या कायम आहे. काही ठिकाणी सिग्नल खूप मजबूत आहे, तर काही ठिकाणी तो अजिबात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, मोबाइल फोन बूस्टर मोबाइल सिग्नल वाढवून ही समस्या सोडवतो. जेणेकरून लोक खराब कव्हरेज असलेल्या भागातही त्यांचा फोन सामान्यपणे वापरणं सुरू ठेवू शकतात. सेल फोन बूस्टर हे असे उपकरण आहे जे मोबाईल फोनचा सिग्नल वाढवते. हे डिव्हाइसच्या एका ठराविक पातळीपर्यंत कव्हरेज सुधारते. घरी, कार्यालयात किंवा ग्रामीण भागात चांगला सिग्नल मिळवण्यासाठी तुम्ही सेल फोन बूस्टर वापरू शकता.
जळगावात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव याठिकाणी श्रीजी जिनिंग आहे. तिथे आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. याच कार्यक्रमात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले होते. जळगावमध्ये मंत्री गुलाबाराव पाटील हे शिंदे गटात सामील झाले आहेत. तर शिवसेना नेते सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. राज्यात ठाकरे आणि शिंदे गटात टोकाचे मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशात याठिकाणी हे दोन्ही गट एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
बिहारमध्ये पुन्हा गोंधळ, BPSC च्या उमेदवारांवर पोलिसांनी केला लाठीचार्ज; अनेक विद्यार्थी जखमी
बिहारमध्ये पुन्हा एकदा परिक्षार्थी उमेदवारांवरून गोंधळ झाला आहे. बुधवारी पाटणा येथील बिहार लोकसेवा आयोगाच्या (बीपीएससी) कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या उमेदवारांवर पोलिसांनी लाठीमार केला. लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
ताजमहाल की तेजोमहाल? आज नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आग्रा महापालिकेत चर्चा
प्रेमाची अमर निशाणी म्हटला जाणारा ताजमहाल सतत चर्चेत असतो. ताजमहालचे नाव बदलण्याचा विषय असो, ताजमहालमधील बंद खोलीचे रहस्य असो किंवा ताजमहालच्या आत भगवा परिधान करण्यावर बंदी असो. मात्र, आता याच दरम्यान ताजमहालशी आणखी एक नवीन प्रकरण जोडले गेले आहे. भाजपचे ताजगंज प्रभागातील नगरसेवक शोभाराम राठोड बुधवारी महापालिकेच्या बैठकीत ताजमहालचे नाव बदलून तेजोमहाल करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहेत. नाव बदलण्याचा प्रस्ताव यापूर्वीच सभागृहात मांडण्यात आला आहे.
भाजपा नेत्यानं शौचालय चाटण्यास भाग पाडलेल्या महिलेनं सांगितली आपबिती!
आपल्याच घरी काम करणाऱ्या एका आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा निंदनीय प्रकार करणाऱ्या भाजपाच्या महिला नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. सीमा पात्रा असं त्यांचं नाव असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर भाजपानं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. आता यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पात्रा यांना अटक करण्यात आली आहे. भाजपा नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी आज रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना पीडितेनं घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
हाँगकाँगनं जिंकला टॉस, टीम इंडिया करणार आधी बॅटिंग
आशिया चषकात आज भारत आणि हाँगकाँग हे दोन संघ आमनेसामने येताय. या सामन्याआधी हाँगकाँगनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे.आशिया चषकात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. 2018 साली भारत आणि पाकिस्तानसह हाँगकाँगही एकाच ग्रुपमध्ये होते. आणि आज पुन्हा एकदा आशिया चषकाच्या मैदानातच हे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले आहेत. पण त्याआधी हाँगकाँगच्या एका गोलंदाजानं आपलं टार्गेट आधीच फिक्स केलं आहे.
SD Social Media
9850 60 3590