जन्माष्टमीदिवशी मोठी दुर्घटना; आरतीसाठी जमलेल्या गर्दीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू, अनेकजण बेशुद्ध

जन्माष्टमीच्या दिवशी संपूर्ण देश भगवान श्रीकृष्णाच्या पूजेत मग्न असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात रात्री उशिरा दर्शनासाठी आलेल्या गर्दीत दोघांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गर्दी इतकी होती की मंगला आरतीच्या वेळी गुदमरून 50 हून अधिक लोक बेशुद्ध पडले.

गर्दी वाढल्याने हा अपघात झाल्याचं एसएसपी अभिषेक यादव यांनी सांगितलं आहे. नोएडा येथील रहिवासी निर्मला देवी आणि जबलपूर मूळचे रहिवासी 65 वर्षीय रामप्रसाद विश्वकर्मा अशी घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. बेशुद्ध झालेल्या भाविकांना पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं, तर जवळपास सहा जणांवर उपचार सुरू आहेत.

मृतांच्या नातेवाईकांच्या विनंतीवरून पोलिसांनी शवविच्छेदन न करता मृतदेह ताब्यात दिला. जन्माष्टमीला वर्षातून एकाच दिवशी मंगला आरती होत असल्याने याठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते. याच गर्दीमध्ये गुदमरल्याने ही दुर्घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.