एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन दोन दिवस झाले आहेत, पण अजूनही मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. भाजप नेते आणि मंत्रीपदाची शपथ घेतलेले सुधीर मुनगंटीवार यांनी दोनच दिवसांमध्ये खातेवाटप होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मी तुम्हाला विधिमंडळ रुल्सची माहिती देतो. खातेवाटप झालं नाही तरी मंत्रालयाचं कामकाज थांबत नाही, पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दोन दिवसांमध्ये खातेवाटप होईल, असं सांगितल्याचं मुनगंटीवार म्हणाले. तसंच सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका होतील, असंही मुनगंटीवार म्हणाले.
‘चर्चा करणारे आमची सत्ता आली हेच पचवू शकत नाहीत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ महिला नेत्या विचारतात एकही महिला मंत्रिमंडळात नाही, मात्र महाविकासआघाडीचे पहिले मंत्रिमंडळ बनले तेव्हा एकही महिला नव्हती, त्यामुळे पॉलिटिकल अल्झायमर होता कामा नये,’ असा टोला मुनगंटीवार यांनी सुप्रिया सुळे यांना हाणला.