देशात युपीएससीच्या विद्यार्थ्यांचे निकाल हाती येत असून कित्येक विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळत आहे. अशात केरळमध्ये लोकसेवा आयोगाची परिक्षा पास झालेल्या दोघांची ही घटना आहे. केरळमध्ये, मलप्पुरममधील 42 वर्षीय आई (बिंदू) आणि तिचा 24 वर्षीय मुलगा (विवेक) यांनी मिळून लोकसेवा आयोग (पीएससी) परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे.
दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही एकत्र कोचिंग क्लासला जायचो. माझ्या आईने मला या पदापर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घेतली. तर माझ्या वडिलांनी आमच्यासाठी सर्व सोयीसुविधांची व्यवस्था केली. आम्हाला आमच्या शिक्षकांकडून खूप प्रेरणा मिळाली. आम्ही दोघे एकत्र शिकलो पण आम्ही एकत्र पात्र होऊ असे कधीच वाटले नव्हते. आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत, 24 वर्षीय विवेकने ही माहिती सांगितली.
काही लोकांनी तुम्ही वयाच्या 42 व्या वर्षी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कशी देऊ शकला, असा प्रश्न विचारला याबाबत बिंदु म्हणाल्या कि, केरळमध्ये सुरू असलेल्या, स्ट्रीम-2 पदांसाठी कमाल वय 40 आहे. याचबरोबर ओबीसी प्रवर्गात तीन वर्षे, एससी आणि एसटी आणि विधवांसाठी पाच वर्षे सूट आहे. दिव्यांग (भाषण, श्रवण आणि दृष्टी) साठी 15 वर्षांसाठी सवलत आहे तर अस्थिव्यंगासाठी 10 वर्षे आहे. यामध्ये मला एकाचा फायदा झाल्याने मी या पदापर्यंत येऊ शकल्याची माहिती बिंदु यांनी दिली..