बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शनिवारी (३० जुलै) महाराष्ट्राच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावत भारताचे पदकांचे खाते उघडले. त्यानंतर आता भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
मीराबाई चानूने २२ व्या राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये भाराताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. ४९ किलो वजनी गटात चानूने ही धडाकेबाज कामिगिरी केली आहे. याआधीही चानूने गोल्डकोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
याआधी महाराष्ट्रच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावत भारतासाठी पदकांचे खाते उघडले होते. त्याने वेटलिफ्टींगमध्ये ५५ किलोग्रॅम वजनी गटात ही कामगिरी केली. संकेत सरगरनंतर पुरुष वेटलिफ्टिंगच्या ६१ किलो वजनी गटात गुरुराजा पुजारी याने देखील कांस्यपदक मिळविले.
कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात भारताच्या बिंदियारानी देवी या तरुणीने पहिले पदक जिंकले. मणिपूरच्या या 23 वर्षीय महिला वेटलिफ्टरने 55 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. तिने एकूण 202 किलो वजन उचलले. भारताचे कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील हे चौथे पदक असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमधून आलेली आहेत. यापूर्वी महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने सुवर्णपदक जिंकले होते. तर संकेत महादेव सरगरने रौप्य आणि गुरुराज पुजारीने कांस्यपदक पटकावले. भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले असून पदकतालिकेत आपण आठव्या क्रमांकावर आहे.