कोरोनाचा इतका संसर्ग का पसरत आहे किंवा इतके रुग्ण का वाढत आहेत, त्याच्या कारणांची एक यादी केंद्र सरकारने जारी केली आहे. सरकारने ट्विटर अकाउंटवरुन ही यादी शेअर करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या बचावासाठी ही उपयुक्त ठरेल असा विश्वास सरकारला आहे. धुम्रपान, हृदय आणि श्वसनासंबंधित आजार कोरोना व्हायरससाठी जास्त धोकादायक असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे.
सरकारने ट्विटर अकाऊंटवरुन व्हायरस पसरवणाऱ्या धोक्यांची यादी आणि गाईडलाईन शेअर केली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, वृद्ध व्यक्ती ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे , त्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. अशा व्यक्तींसाठी कोरोनाकाळात खबरदारी घेणे आवश्यक आहे.
जागतिक आरोग्य संघटना WHO च्या मते, तंबाखू सेवनामुळे कोव्हिड 19 संसर्गाचा धोका वाढू शकतो. सध्या SARS-CoV-2 संसर्ग आणि धुम्रपान यामध्ये होणारे धोके जास्त आहेत. जानेवारी महिन्यात लंडनमधील रिसर्चनुसार, जे कोरोना रुग्ण सध्या रुग्णालयात अॅडमिट आहेत त्यामध्ये धुम्रपान करणाऱ्यांची संख्या अधिक आहेत. म्हणजेच जे धुम्रपान करतात त्यांना संसर्ग लगेच होतो असा त्याचा अर्थ काढता येईल.
ज्या रुग्णांना मधुमेह किंवा डायबेटिज आहे, अशा रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहेच, पण गंभीर लक्षणे आणि मृत्यू होण्याचं प्रमाण तीनपट आहे.
हृदयरोग, कॅन्सरसारखे आजार असणाऱ्या रुग्णांनाही कोरोनाचा जास्त धोका आहे. हृदयरोग, कॅन्सरसारखे आजार एकापासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गाने होत नाही. मात्र हे आजार गंभीर स्वरुपाचे असल्याने, अशा रुग्णांना कोरोना झाल्यानंतर धोका अधिक वाढतो, असं WHO चं म्हणणं आहे.