अहमदाबादच्या न्यायालयाने शनिवारी मानवाधिकार कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड आणि माजी पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी खोटे पुरावे तयार केल्याच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली होती.
विशेष सरकारी वकील अमित पटेल यांनी सांगितले, की सेटलवाड आणि श्रीकुमार यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना महानगर दंडाधिकारी एस. पी. पटेल यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी या दोघांच्या कोठडीची मागणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या शनिवारी गुन्हा नोंदवल्यानंतर सेटलवाड आणि श्रीकुमार यांना अटक करण्यात आली.
पटेल म्हणाले, की तपासाधिकाऱ्याने पोलीस कोठडी मागितली नाही. त्यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.