हिंदू धर्मात प्रत्येक तिथी, दिवस आणि महिन्याचं खास असं वैशिष्ट सांगितलेलं आहे. जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, यश मिळावं यासाठी लोक देवदेवतांची आराधना करतात. विशिष्ट तिथी, दिवस किंवा महिन्यात आपल्या आराध्य देवतेची पूजा केल्यास जीवनात सर्वकाही मिळतं, असं अभ्यासक सांगतात. लवकरच चार्तुमास सुरू होणार आहे. चातुर्मासात प्रामुख्यानं भगवान विष्णूंची आराधना केली जाते. सनातन धर्मात चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चातुर्मास हा उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. चार्तुमासात केवळ भगवान विष्णुंचीच नाहीतर तुम्ही अन्य कोणत्याही देवाची आराधना, उपासना करू शकता. या कालावधीत भगवान शंकरांची उपासना केल्यास माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं. मात्र, ही उपासना करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही विशेष नियम सांगितले आहेत. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे.
आषाढ महिन्यात देवशयनी एकादशीनंतर चार्तुमास सुरू होतो. त्यानंतर चार महिने हा चार्तुमास असतो. हा कालावधी श्री विष्णु पूजनासाठी श्रेयस्कर मानला जातो. पण या कालावधीत तुम्ही भगवान शंकरांसह अन्य देवतांची उपासनादेखील करू शकता. ज्योतिषशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार चार्तुमासात तुम्ही रोज तुळशीची पूजा करणं तिला जल अर्पण करणं आवश्यक आहे. यामुळे भगवान विष्णुंसह लक्ष्मीमाताही प्रसन्न राहील. लक्ष्मीमातेच्या कृपेमुळे तुम्हाला पैशांची कमतरता जाणवणार नाही. धनलाभ होईल.
चार्तुमासात रोज मंदिरात जावं. तसंच या कालावधीत जमेल तसा दानधर्म करावा. चार्तुमासात तुम्ही अन्न, वस्त्र दान करू शकता. याशिवाय छाया दानदेखील लाभदायक ठरू शकतं. मंदिरात पूजा, सेवा केल्यानं पुण्य प्राप्त होतं, असं जाणकार सांगतात.
चार्तुमासादरम्यान भगवान विष्णुंसोबतच भगवान शंकरांची पूजाही करावी. रोज सकाळी लवकर उठून स्नान करावं. त्यानंतर मंदिरात जाऊन शंकरांची उपासना करावी. यावेळी त्यांना गंगाजल अर्पण करावं.
खरं तर कोणत्याही प्रकारची उपासना, पूजा आणि भजनासाठी ठराविक वेळेची वाट पाहू नये. परंतु, चार्तुमासात अशी शुभ कार्य अवश्य करावी. यामुळे देवता प्रसन्न होतात. देवतांच्या कृपेमुळे आपलं जीवन सुखी होतं, असं जाणकार सांगतात.
चार महिने चालणाऱ्या चार्तुमासादरम्यान भगवान विष्णू आणि इतर देवता योगनिद्रेत असतात. देवउठणी अर्थात प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू आणि इतर देवता निद्रेतून जाग्या होतात. या कालावधीत अनेक विष्णुभक्त यथाशक्ती पूजा-विधी करतात. अनेक लोक चार्तुमासात विशिष्ट व्रत करतात तर काही लोक सात्त्विक भोजन घेतात. सर्व प्रकारच्या धार्मिक गोष्टींसाठी चार्तुमासाचा कालावधी हा शुभ मानला गेला आहे. त्यामुळे केवळ भगवान विष्णूच नाही तर भगवान शंकरांची उपासना या कालावधीत केल्यास ती फलदायी होते.