भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटर आणि संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्याच्या तब्येतीच्या संदर्भात ही माहिती आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याला कोरोनाची लागण झाली. यावर आता बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे.
बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण –
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, तो आता बरा झाला आहे, असे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिले आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी सामना खेळणार आहे. 1 जुलैपासून हा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र, त्याआधी टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी आली.
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विनला देखील कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान, इंग्लंडमध्ये रस्त्यांवर विराट कोहली हा मास्क न घालता दिसला होता. तसेच याप्रकारचे विराट कोहलीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनामधून बरा झाल्यावर मास्क न घालता विराट कोहली कसा फिरू शकतो, तसेच त्याच्या चाहत्यांसोबत सेल्फी कसा घेऊ शकतो, असे प्रश्न विचारले जात आहेत.